नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिरात आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंदिरातील ड्रेसकोडचा मुद्दा चर्चेत आला होता.महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र, असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं देवस्थानाकडून स्पष्ट करण्यात आलं. पण आता सप्तशृंगी गडावरील आदिमायेच्या मंदिरात पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेसकोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक आहेत. लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

नागपूर, पुणे येथील काही मंदिरांत भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय मंदिर फेडरेशन, ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर आता भाविकांना पूर्ण पेहरावात आल्यावरच देवीचे दर्शन घेता येणार आहे. आरती आणि पूजेच्या कालावधीत आलेल्या आणि नोंदणी केलेल्या भाविकांनाच गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे. तर पुरुषांना सोवळे आणि महिला भाविकांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार असल्याची माहिती ट्रस्टकडून मिळाली आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाताना पूर्ण पेहरावात जावे लागणार आहे.

राज्यात भाविकांसाठी सर्वप्रथम या मंदिरात लावला ड्रेस कोडचा बोर्ड; फॅशन करायची असेल तर…
सप्तशृंगी गड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून भाविक येत असतात. मात्र काही भाविक तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी येतात. त्यामुळे पावित्र्य भंग पावत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्याची मागणी होत आहे. गडावरही अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून भाविक येत असल्याने मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली पाहिजे, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. लवकरच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार यांनी म्हटले आहे. तर वस्त्रसंहिता लागू करण्याच्या निर्णयावर सकारात्मक असून याबाबत अभ्यास करून अध्यक्ष, विश्वस्त मंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अॅड. ललीत निकम यांनी सांगितले आहे.

Mahaganpati : रांजणगाव गणपती देवस्थानचे त्या बॅनरबाबत स्पष्टीकरण, भाविकांसाठी आली मोठी अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here