राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. वयाच्या ७९व्या वर्षी राज्यपालांनी पायीच शिवनेरी गड सर केला. अवघ्या ५० मिनिटांत त्यांनी पायीच गड सर केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरचीही मदत घेतली नाही. मी साधा माणूस आहे. मला हेलिकॉप्टरची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज अनेकवेळा या गडावर पायी आले होते. मीही पायीच हा किल्ला सर करणार, असं सांगत त्यांनी बघता बघता गड सर केला. त्यानंतर राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.

२० वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यपाल शिवनेरीवर आले होते. यावेळी त्यांना शिवनेरीवर जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची लगबग सुरू झाली. तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना थांबवले. यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं म्हणत त्यांनी शिवनेरीच्या एक एक पायऱ्या चालण्यास सुरुवात केली. कोश्यारी वेगाने पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढताना ते मध्ये थांबले नाहीत किंवा त्यांना थकवाही जाणवला नाही. राज्यपालच सलग चालत असल्याने त्यांच्या ताफ्यातील सर्वांनाच पायी चालणे भाग पडले.

कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो असं राज्यपालांनी सांगितलं. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत. शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते, असं त्यांनी सांगितलं.

शिवनेरीचा परिसर पाहतानाच राज्यपालांनी शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे तान्हाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचीही आठवण काढली. यापुढील काळात प्रभू राम, श्रीकृष्ण, गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या राज्यातील आणि केंद्रातील प्रवृत्तींवर नाव न घेता निशाणा साधला. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन उत्तराधिकारी म्हणावणाऱ्यांनी दिखावा करू नये, अशा शब्दात त्यांनी फटकारले.

राज्यपालांनी अवघ्या ५० मिनिटात गड सर केला. त्यानंतर त्यांनी गडची पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. विविध वास्तूंची माहिती घेत. गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि दिलखुलास गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here