मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी आज केली.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मित्रासह फिरायला गेला, बाईकवर बसून फोटो काढत होता, बाईक सरकली, अचानक ७०० मीटर खोल दरीत पडला
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.

व्हायरल होतोय अमूल लस्सीमध्ये बुरशी असल्याचा दावा करणारा व्हिडिओ; जाणून घ्या काय आहे सत्य

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती मागणी

मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केल्याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे. १६ मार्च २०२३ रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी केली होती. आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील आणि त्यातून उद्याच्या समर्थ भारतासाठी गौरवशाली पिढ्यांचे निर्माण होईल.’
Breaking वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here