अहमदाबाद : पावसामुळे अखेर आयपीएलता अंतिम सामना हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पाऊस पडल्यावर आयपीएलचे नियम काय आहेत, जाणून घ्या…

  • प्लेऑफ सामना षटकांची संख्या कमी न करता रात्री ९.४० वाजता उशिरा सुरू होऊ शकतो (१० मिनिटांचा मध्यांतर, टाइम-आउट कायम).
  • प्लेऑफ सामन्यातील षटकांची संख्या, आवश्यक असल्यास, कमी केली जाऊ शकते जेणेकरून प्रत्येक संघाला ५ षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल.
  • प्रत्येक बाजूचा पाच षटकांचा नवीनतम सामना रात्री ११.५६ (१० मिनिटांचा मध्यांतर) सुरू होऊ शकतो १२.५० वाजता नियोजित समाप्तीसह.
  • अतिरिक्त वेळेच्या शेवटी ५ षटकांचा सामना पूर्ण करणे शक्य नसेल तर, संघ, परिस्थितीने परवानगी दिल्यास, विजेता निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर खेळतील. याचा अर्थ असा आहे की खेळपट्टी आणि मैदान खेळण्यासाठी तयार असले पाहिजे जेणेकरून सुपर ओव्हर रात्री १२.५० च्या आत सुरू होईल.
  • सुपर ओव्हर सुरू करणे शक्य नसल्यास, हा सामना राखीव दिवशी जाऊ शकतो.
  • पण राखूव दिवशीही पाऊस सुरु राहीला आणि सामना झाला नाही तर नियमित हंगामातील ७० सामन्यांनंतर लीग टेबलमध्ये सर्वोच्च स्थान मिळविलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल.

आजचा सामना हा पावसामुळे स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे तो आता राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. हा राखीव दिवस म्हणजे २८ मे हा असेल. हा सामना आता सोमवारी खेळवण्यात येणार आहे. पण सोमवारी पाऊ पडणार की नाही, यावर हा सामना होणार की नाही ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सोमवारी पुन्हा एकदा पाऊस पडणार की नाही, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे आता सर्व चाहत्यांना सोमवारची उत्सुकता असेल. पण पावसाने पुन्हा एकदा हिरमोड करू नये, अशीच आशा आता चाहत्यांची असणार आहे. आयपीएलची फायनल पहिल्यांदाच अशी राखीव दिवशी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here