मुंबई: राज्यात सुरू झाले आहेत. इतर गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. मग का उघडल्या जात नाही?, असा सवाल मनसेचे अध्यक्ष यांनी केला आहे.

राज्यात मिशन बिगीन अंतर्गत सर्वच गोष्टी सुरू होत आहेत. मात्र मंदिरं अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे १५ मिनिटे ही बैठक चालली. यावेळी राज ठाकरे यांनी मंदिरं सुरू करण्यावर सकारात्मकता दाखवतानाच त्यानुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवरही बोट ठेवले. मंदिरं खुली झाली पाहिजेत. मॉल सुरू होतात, मग मंदिरं का सुरू होत नाहीत. शासकीय नियमांचं पालन करूनच मंदिरं खुली व्हावीत, पण मंदिरं सुरू केल्यानंतर भाविकांची झुंबड उडाल्यास तुम्ही काय कराल? भाविकांची गर्दी कशी रोखाल? करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गर्दीवर कसे नियंत्रण आणाल? असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. तसेच मंदिरं सुरू केल्यानंतर इतर धर्मिय नियम पाळतील काय?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

दरम्यान, कालच राष्ट्रवादीचे आमदार पार्थ पवार यांनी मंदिरं सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत असं माझंही म्हणणं आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं ते म्हणाले होते. विशेष म्हणजे पर्युषण पर्व काळात मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलेलं असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

Leave a Reply to ทิชชู่เปียกแอลกอฮอล์ Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here