म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मतदारांपर्यंत थेट पोहोचून राजकीय पक्षाने घेतलेल्या निर्णयाची, योजनांची माहिती देण्यासाठी पक्षांचे ‘यात्रा’ हे प्रमुख माध्यम आहे. भाजपची रथयात्रा किंवा काँग्रेसच्या ‘भारत जोडो’च्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने एसटीच्या विविध योजना, निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी यात्रेचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर अर्थात १ जूनपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे.देशातील सर्वाधिक प्रवासी ई-बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान यांसह अन्य योजनांची माहिती घराघरांत पोहोचवणे आणि एसटीचे पुनरुज्जीवन करताना सरकारने घेतलेले निर्णयांची माहिती देण्यासाठी ही यात्रा निघणार आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार शिवसेनेनेदेखील राज्यात मतदारबांधणीचे नियोजन पूर्ण केले आहे. राज्यातील ९७ टक्के नागरिक प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतील तब्बल ५८० बस स्थानकांत ही यात्रा पोहोचणार आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप, अनियमित पगार, अपुरा वाहन ताफा यांमुळे महाविकास आघाडी सरकारकाळात एसटी महामंडळ चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
यात्रेसाठी व्होल्वोमध्ये अंतर्गत बदल
या यात्रेसाठी शिवनेरी प्रकारातील व्होल्वो श्रेणीतील बसमध्ये अंतर्गत बदल करण्यात येणार आहे. बसच्या आतील आसने हटवून एका बाजूला एसटीचे बदलणारे रूप आणि दुसऱ्या बाजूला सरकारी योजना आणि निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. यात बसगाड्यांची प्रतिकृती, पोस्टर, चित्रे यांचाही समावेश असणार आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी काम करणारी ‘बस फॉर अस फाऊंडेशन’ बस सजावटीचे काम करत आहे. हे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.