आज आयपीएलच्या २०२३ च्या अंतिम फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्स सलग दुसरं विजेतेपद पटकावणार की चेन्नई त्याचं पाचवं विजेतेपद पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, राखीव दिवशी देखील पावसामुळं मॅच झाली नाही तर काय? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
आयीपएलमध्ये संयुक्त विजेता जाहीर करण्याची पद्धत नाही. त्यामुळं यंदा आयपीएलमध्ये प्रथमच राखीव दिवशी अंतिम फेरीची लढत होणार आहे. त्यामुळं आज देखील पाऊस झाल्यास आयपीएल व्यवस्थापन सुपरओव्हर खेळवली जाऊ शकते. पावसामुळं सुपरओव्हर न झाल्यास गुजरातच्या संघाला विजेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे.
गुजरातला विजेतेपद मिळणार?
अहमदाबादमधील वातावरणाचा विचार केला असता आज देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज देखील पावसामुळं सामना होऊ शकला नाही तर गुजरात टायटन्सला विजेता म्हणून जाहीर केलं आहे. मात्र, आयपीएल व्यवस्थापन मॅच कशी होईल याचा प्रयत्न करेल, अशी माहिती आहे.
पावसामुळं आज देखील मॅच न झाल्यास गुजरातला विजेतेपद दिलं जाऊ शकतं कारण गुजरातच्या टीमचं लीग स्टेजमध्ये प्रदर्शन चांगलं होतं. सीएसके पेक्षा गुजरातची कामगिरी सरस होती. गुजरातनं लीग स्टेजमध्ये ९ सामन्यांमध्ये विजय मिळवत १८ गुण मिळवले होते. रनरेटमध्ये ही गुजरातची बाजू वरचढ होती.
दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जनं लीग स्टेजमध्ये १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले होते. तर एक सामना पावसामुळं रद्द झाल्यानं त्यांना १७ गुण मिळाले आहेत. गुणतालिकेत चेन्नई दुसऱ्या स्थानावर होती. आज देखील पाऊस झाल्यास चेन्नईचा खेळ बिघडू शकतो.