बुलडाणा : समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मध्यरात्री हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या आगीत कार जळून खाक झाली. यात कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.समृद्धी महामार्गावर कारला अपघात होऊन ती सुरुवातीला इम्पॅक्ट बॅरियरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर कारला आग लागली. या आगीत होरपळून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही कार नागपूर शिर्डीला निघाली होती. बुलडाण्यातील देऊळगाव पोळ या गावाजवळ कारला अपघात झाला. सामान्यांच्या लालपरीचे आरोग्य व्हेंटिलेटरवर! एसटीला ५० किमीसाठी दोन तास, गतिमान सरकारच्या काळात एसटीची दुर्दशा अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस आता तपास करत आहेत. अपघात इतका भीषण होता आगीत कार जळून खाक झाल्याने ती कुठली होती आणि त्यात कोणते प्रवासी होते? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीत कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळखही पटवता येत नाहीए. अपघातातील जखमीवर दुसरबीड रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडोरवरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. या घटनेतील मृतदेह दुसरबीड रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.