Authored by पवन येवले | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 May 2023, 9:13 am

Police Bharti Result Three Recruits From Nirhale Fatehpur Sangle Family : नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेत राज्यभरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील आणि शेतकरी कुटुंबातील मुलांनी यश संपादन मिळवले आहे. जनसेवेसाठी पोलीस दलात दाखल झाले आहेत. यातच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सांगळे कुटुंबातील बहीण भावांनी स्पर्धा परीक्षेत भरारी घेतली आहे. आणि त्यांनीही मोठं यश मिळवल्याने त्यांची चर्चा होत आहे.

 

Nashik Sinnar News
लेकरांनी करून दाखवलं, शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; पोलिसात दोघं तर तिसरा सैन्यात भरती, सांगळे कुटुंब चर्चेत
नाशिक : राज्यातील पोलीस भरतीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये अनेक तरुण तरुणींची निवड झाली आहे. मात्र, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा लष्करात, तर आणखी एक मुलगा आणि मुलगी पोलीस दलात भरती झाल्याने शेतकरी माता-पित्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रबळ इच्छाशक्ती मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एकाच कुटुंबातील या भावंडांनी यश मिळवलं आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निरहाळे फत्तेपूर येथील बबन भिकाजी सांगळे हे पत्नी सावित्री, मुलगी व दोन मुलांसोबत राहतात. त्यांनी शेती करून आपल्या तीनही मुलांना उच्चशिक्षित केलं आहे. एक मुलगा देश सेवेसाठी सैन्य दलात तर एक मुलगा आणि एक मुलगी जनसेवेसाठी पोलीस दलात भरती झाले आहेत.
Nashik : सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू होणार, गाभाऱ्यात या भाविकांनाच मिळणार प्रवेश
सांगळे कुटुंबातील मोठी मुलगी ज्योती हिने पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केली. पोलीस भरतीसाठी सराव सुरू असताना भाऊ अमोल आणि बालाजी यांनीही भरतीसाठी तयारी सुरू केली. दोन्ही भावंड आणि बहीण आपल्या घराच्या परिसरातच भरतीसाठी मेहनत घेऊ लागले. धावण्याचा सराव उड्या मारणे व्यायाम करणे, गोळा फेक असा सराव सुरू असतानाच भरतीच्या परीक्षेचेही तयारी केली. आणि अखेर त्यांच्या मेहनतीने त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवले.
ज्याची बांगड्यांची गाडी त्याला लाखाचं वीजबिल देऊन ‘शॉक’, महावितरणवाल्यांनो हे बरं नव्हं…!
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत बहीण ज्योतीची आणि भाऊ अमोल यांची मुंबई पोलीस दलात भरती झाली. त्यांचा लहान भाऊ बालाजी याने याच दरम्यान, भारतीय सैन्य दलाची परीक्षा दिली होती. आणि त्यात त्याला यश मिळाल्याने सैन्य दलात त्याची निवड झाली. सिन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले पोलीस दलात आणि सैन्य दलात भरती झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here