बंगळुरु : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत सत्ता स्थापन केली. काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं १३५ जागांवर विजय मिळवला त्यामुळं अनेकांना मंत्रिपदाची आशा होती. नुकताच सिद्धारामय्या यांच्या मंत्रिमंडळात २४ नेत्यांचा समावेश करण्यात आला. काँग्रेस नेते टी.बी. जयचंद्र यांना पक्षानं विधानसभा अध्यक्ष होण्याची ऑफर दिली होती, मात्र ती त्यांनी नाकारली होती. यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आलेला नाही.

काँग्रेस सदस्य टी.बी. जयचंद्र यांच्या नातीनं राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. जयचंद्र यांच्या ७ वर्षाच्या नातीनं राहुल गांधींना पत्र लिहून तक्रार केली आहे, आजोबांना मंत्री का केलं नाही, असा प्रश्न तिनं विचारला आहे. आजोबांना कर्नाटक मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये संधी द्या, अशी मागणी केली आहे. जयचंद्र याचं नाव यादीत असल्याची चर्चा होती, अखेरच्या टप्प्यात त्यांचं नाव यादीतून बाहेर पडलं. जयचंद्र यांना मंत्रिपद न दिल्यानं कुंचितिगा समुदाय नाराज असल्याची चर्चा आहे.

सात वर्षांच्या आरना संदीप हिनं राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. ‘प्रिय राहुल गांधी, मी टी.बी. जयचंद्र यांची नात आहे, माझ्या आजोबांना मंत्री केलं नाही त्यामुळं मी अस्वस्थ आहे, त्यांना मंत्री केलं पाहिजे कारण ते मेहनती आहेत, लोकांशी प्रेमानं वागतात आणि मदत करतात, त्यांना मंत्री केलं पाहिजे’, असं आरना संदीप हिनं म्हटलं आहे.

काँग्रेसनं मंत्रिमंडळ विस्तार करत २४ जणांना नव्यांना संधी दिली होती. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यासह ८ जणांनी त्यापूर्वी शपथ घेतली होती. टीबी. जयचंद्र यांची मात्र यामध्ये संधी हुकली होती. त्यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्ष होण्याची ऑफर देण्यात आली होती. ती त्यांनी नाकारली होती.
WTC फायनलसाठी भारतीय संघात झाला बदल; ऋतुराजच्या जागी मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजाची निवड

आरना संदीप ही तिसरीमध्ये शिकते. जयचंद्र यांचा मुलगा संदीप टीजे यांची ती कन्या आहे. टीव्हीवर बातम्या पाहताना कळलं की आजोबांना मंत्री केलं गेलं नाही त्यावेळी रडू आल्याचं तिनं म्हटलं.
यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून परतताना काळाचा घाला, ट्रकने कारला चिरडलं, दोन मुलांसह सहा ठार

मंत्री म्हणून संधी न मिळाल्यानं नेत्यांच्या समर्थकांनी राजभवन आणि राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी जोरादार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी मेगा अलर्ट, अन्यथा काळ्या यादीत जाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here