विरार: घर सोडून गेलेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी केलेल्या पूजाविधीचा फायदा झाला नाही आणि पैसेही वाया गेले, या रागातून विरारमध्ये एका पुजाऱ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला. पोलिसांना मांडवीच्या देसाईवाडीच्या बसस्टॉपजवळ भिवा वायडा (वय ७५) यांचा मृतेदह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला तेव्हा यामध्ये तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या एका गुन्हेगाराचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. विनोद बसवंत असे या गुन्हेगाराचे नाव आहे. विनोद बसवंत हा करोनाच्या काळात तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. दरम्यानच्या काळात विनोदची पत्नी घर सोडून गेली होती. अनेक प्रयत्न करूनही विनोदची पत्नी घरी परतत नव्हती. त्यामुळे विनोद बसवंत याने भिवा वायडा यांच्याकरवी एक पूजाविधी करवून घेतला होता. त्यासाठी विनोदने भिवा वायडा यांना २००० हजार रुपये दिले होते. याचा वादातून विनोदने भिवा वायडा यांना खून केल्याचा आरोप आहे.

मित्राची मस्करी करणं महागात पडलं, खिशातला मोबाईल काढला म्हणून मित्राला जिवानिशी मारलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुरुवारी देसाईवाडीच्या बसस्टॉपजवळ भिवा वायडा यांना मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, संशयित आरोपी विनोद बसवंत याने आपली पत्नी घरी परत यावी, यासाठी पूजाविधी करण्यासाठी वैद्य यांना २००० रुपये दिले होते. मात्र, पूजाविधी करूनही पत्नी घरी परत आली नाही तेव्हा विनोदने भिवा वायडा यांच्याकडे पैसे परत मागितले. बुधवारी रात्री विनोदने भिवा वायडा यांना उसगाव येथे भेटायला बोलावले. याठिकाणी दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर विनोद बसवंत यांनी पुन्हा एकदा वायडा यांच्याकडे पैसे परत मागितले. मात्र, वायडा यांनी पूजाविधीचे २००० रुपये परत देण्यास नकार दिला. तेव्हा संतापलेल्या विनोदने भिवा वायडा यांच्या डोक्यात सिमेंटच्या ठोकळ्याने प्रहार केले. यानंतर विनोद बसवंत तिथून पळून गेला.

भयंकर! शेतात बायकोवर वार; शिर हातात घेऊन गावात आला; दारात ठेवून कित्येक तास बसून राहिला

या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी विनोद बसवंतला पकडण्यासाठी सापळा रचून शनिवारी जेरबंद केले. मांडवी पोलिसांना विनोद बसवंत आणि भिवा वायडा यांचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. विनोद बसवंतला यापूर्वीही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून विनोद बसवंत ठाण्यातील कारागृहात होता. मांत्र, मध्यंतरीच्या काळात तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here