भोर : शहरातील मध्यवर्ती भागातील न्हावी आळीतील एका सोसायटीत विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पद्मजा घोरपडे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत घोरपडे (वय ४२), संदीप घोरपडे (वय ४०), कलावती घोरपडे आणि रेश्मा घोरपडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत प्रभाकर दिनकर खोपडे (वय ७०, रा. भाटघर, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी माहिती दिली. पोलिसांनी चंद्रकांत व संदीप यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Virar News: पूजाविधी करुनही बायको घरी परतली नाही, २००० रुपये परत मागितले; नकार मिळताच पुजाऱ्यालाच संपवलं

आंदोलनकर्त्या पैलवानांची धरपकड, पोलिसांशी संघर्ष पेटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मजाचा विवाह मे २०१४मध्ये झाला. शनिवारी पद्मजाचे वडील आणि बहिणीने संपर्क केल्यावर फोन बंद लागला असता घरी जाऊन पाहिले, तेव्हा सदनिकेतील छताच्या पंख्याला दोरी बांधून तिने गळफास घेतल्याचे आढळले. लग्नानंतर दोन महिन्यांपासून तिचा नवरा व सासरच्या लोकांनी संगनमताने तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. तिचे जगणे असह्य करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप पद्मजाच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here