पुणे : कल्याणीनगर मारीगोल्ड आयटी पार्कला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे आयटी पार्कमध्ये सकाळच्या शिफ्टला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जण हे टेरेसवर पळाले होते. तर काही जण वरच्या मजल्यावर आडकले होते. अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उंच इमारत असल्यामुळे उंच शिडीचा वापर करून चार कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अजून काही कर्मचारी घटनास्थळी आडकले आहेत.Pune Crime : अनैतिक संबंधातील व्यवहारातून बिनसलं, मित्रांनीच घात केला; पुण्यातील हत्या प्रकरणाचे गूढ उकलले
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातल्या मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी हे वरच्या मजल्यावर अडकले असल्याचं दृश्य दिसत होतं. जवानांनी उंच शिड्यांचा वापर करून आणि इमारतीच्या काचा फोडून अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांची सुटका केल्याचं दृश्य फोटोमधून दिसत आहे. तर काही कर्मचारी हे आग लागल्यामुळे टेरेसवर पळाले होते. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तर अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बचावकार्य सुरू आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजितदादा लावणार हजेरी..? खेड तालुक्यात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here