‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले तरी त्यांना काही कळत नाही. माझ्या मते डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरकडून औषध घेत नाही, कम्पाऊंडरकडून घेतो,’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. भाजपनं लगेचच संधी साधत या प्रकरणी राऊत यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. सोशल मीडियातही राऊत प्रचंड ट्रोल होत आहेत.
‘मार्ड’नं राऊत यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ‘एकीकडे डॉक्टरांना करोना योद्धे म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वक्तव्यं करायची याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? अनेक दिवसांपासून घरी न जाता, आईवडिलांचे तोंडही न पाहता जिवाची बाजी लावून अनेक डॉक्टर काम करत आहेत. डॉक्टरांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं ते हे ऐकण्यासाठीच का? डॉक्टरांना काही कळत नसेल तर सरकारने डॉक्टरांचे कृती दल कशासाठी तयार केले,’ अशी विचारणाही ‘मार्ड’नं () पत्रातून केली आहे.
वाचा:
‘राऊत यांनी केलेलं वक्तव्य तरुण डॉक्टरांचं खच्चीकरण करणारं आहे. आपली सुद्धा अशीच अधिकृत भूमिका आहे का,’ असा प्रश्न ‘मार्ड’नं केला आहे. तसं नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा, त्यांनी मांडलेली भूमिका हीच आपली अधिकृत भूमिका आहे हे गृहित धरून डॉक्टर रस्त्यावर उतरतील,’ असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I like the valuable information you provide in your articles.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.