मुंबई : मिरा रोडमध्ये ज्वेलरच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोंडावर मास्क ओढून दोन जण ज्वेलरच्या दुकान घुसले. यापैकी एकाकडे रिव्हॉल्वर होतं. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यावेळी ज्वेलर दुकान मालकाने दरोडेखोरांचा लुटीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी त्यांनी ज्वेलर दुकान मालकाचा मोबाइल हिसकावला आणि बाइकवरून पळून गेले. लुटीसाठी आलेल्या दोघांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत.मोहीत कोठारी (वय ३२) यांचं मिरा रोडमध्ये विजय पार्क भागात कोठारी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. दुकान ते एकटे असताना तोंड झाकलेले दोन जण ग्राहक असल्याचे भासवून दुकानात घुसले. शनिवारी दुपारी सव्वाचारची ही घटना आहे. दोघांपैकी एकाच्या हातात ग्लोव्हज् होते आणि त्याच्याकडे बॅग होती. दुसऱ्यानेही तोंड झालेलं होतं आणि हे दोघंही जवळपास २०तील तरुण वाटत होते. आणि ते हिंदीत बोलत होते.

या घटनेचं दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यातील मुख्य आरोप हा स्टुलवर त्याची बॅग ठेवताना दिसतो आणि कोठारी यांच्याशी बोलणं सुरू करतो. जुनी अंगठी बदलवून नवीन घ्यायची आहे, असं त्याने सांगितलं. कोठारी यांना संशय आला आणि त्यांनी त्या दोघांना तातडीने दुकानातून निघून जाण्यास सांगितलं. दोघे हल्ला करण्यासाठी येताच कोठारी यांनी फोन करण्यासाठी मोबाइल उचलला. त्यांनी कोठारी यांना धमकावण्यास सुरुवात केली.

मुख्य आरोपीने रिव्हॉल्वर काढली आणि कोठारी यांच्या दिशेने रोखून धरली. कोठरी पटकन खाली वाकले आणि त्यांनी लोखंडी सळई उचलून त्यांच्या दिशेने भिरकावली. सोबतच त्यांनी मदतीसाठीचा अलार्मही वाजवला. पण दुकानाचं दार बंद असल्याने आवाज बाहेर गेला नाही. हा सर्व प्रकार दोन मिनिटांत घडला. यावेळी कोठारी यांनी दुकानाबाहेर धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठोपाठ दोघं आरोपीही दुकानाबाहेर आले आणि आपल्या बाइकवर बसून पळून गेले. पण ते कोठारी यांचा मोबाइल घेऊन पळाले.
ॲट्रॉसिटीत माघारीचे ‘कलम’; मुंबईत २३ वर्षांत दाखल २२५हून अधिक गुन्ह्यांत वगळले कलम
दुकानाजवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. आरोपी बाइकवरून मिरा रोडमधील सिल्वर पार्ककडे पळून जाताना दिसत आहेत. तसंच संशयितांकडे असलेली रिव्हॉल्वर ही बनावट होती. कारण ते शेवटपर्यंत कोठारींवर लक्ष ठेवून होते आणि गोळीबारही केला नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
अखेर न्याय झालाच! ‘त्या’ परदेशी महिलेची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा; भायखळ्यातील प्रकार
पोलिसांनी या प्रकरणी तपासासाठी एक पथक नेमलं आहे. आरोपींचे फोटो आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. या घटनेत कोठारी हे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here