धनबादमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. यावेळी उच्चदाब क्षमतेची तार तुटल्यानं सहा मजुरांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाला आहे. ते कर्मचारी विजेच्या खांबाजवळ काम करतहोते. यावेळी विजेच्या धक्क्यानं ६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.या घटनेची माहिती मिळताच धनबाद रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कालका येथून हावडा येथे जाणारी नेताजी एक्स्प्रेस देखील थांबवण्यात आली आहे. नेताजी एक्स्प्रेस ही तेतुलमारी स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तर, हावडा येथून बिकानेरला जाणारी प्रताप एक्स्प्रेस देखील थांबवण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस धनबाद स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी आणि रेल्वेचे डॉक्टर रस्ते मार्गानं घटनास्थळी पोहोचण्यासाठी गेले आहेत.
कुठं घडली घटना ?
धनबाद रेल्वे मंडळाच्या अंतर्गत हावडा नवी दिल्ली मार्गावर धनबाद आणि गोमो रेल्वे स्टेशन मधील निचितपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. विजेचा धक्का लागल्यानं ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटेनला धनबादच्या डीआरएम यांनी दिला आहे. मृत व्यक्ती हे मजूर असल्याची माहिती आहे.
कतरास रेल्वे स्टेशनच्या जवळ एक किलोमीटर अंतरावर झारखोर फाटकाजवळ पोल लावण्याचं काम सुरु होतं. त्यावेळी मजुरांना विजेचा धक्का लागला. उच्चदाब क्षमतेची तार कोसळल्यानं मजूर जागीच दगावले.
धनबादमधील या दुर्घटनेमुळं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या विविध रेल्वे स्टेशनमध्ये थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीररित्या भाजले असल्याची माहिती आहे.