नाशिक: एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीचं अपहरण केल्याने अपहरणाच्या घटनेनंतर तासाभरात तरुणीच्या आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी २८ मे रोजी अपहरण करणाऱ्या संशयित समाधान झनकर याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमधून दारुच्या बाटल्याचे बॉक्स पडले, बाटल्या घेऊन जाण्यासाठी लहानमुलं अन् महिलांची झुंबड

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोपी समाधान झनकर याचं १९ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. यामुळे तो लग्नासाठी तरुणीकडे वारंवार तगादा लावत होता . रविवारी दुपारी एकच्या सुमारास संबंधित तरुणी आई वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत असताना, चारचाकीतून आलेल्या समाधान झनकरने आपल्या साथीदारांसह नाशिकच्या घोटी-पांढुर्ली महामार्गावरुन तिचं अपहरण केलं होतं. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मुलीचं अपहरण आणि तरुणाचा लग्नासाठी तगादा यामुळे कंटाळलेल्या आई वडिलांनी मुलीच्या अपहरणानंतर एक तासातच भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली.

Nashik Crime : तरुणीचं लग्न जमलं; पण प्रियकर, पालकांसह प्रकरण थेट पोलीस ठाण्यात: पोलिसांनी सगळ्यांनाच झोडपलं!
मुलीचे आई वडील हे आज दुपारी देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसरात आले. रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक १८०/०१ आणि १८०/०३ यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी गोदान एक्सप्रेसखाली स्वतःला झोकून दिले. या घटनेची माहिती नाशिक रोड रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

सप्तश्रृंगी मंदिरात चोरट्यांचा डल्ला, ग्रीलमधून हात घालत पादुका चोरीला, घटना सीसीटीव्हीत
याप्रकरणी मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा अपहरण करणाऱ्या संशयित समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहृत मुलीचा आणि आरोपींचा शोध घेण्याकरता रात्रीतूनच पथके रवाना केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here