जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर ट्विटरवर #BoycottChhpaak आणि #ISupportDeepika हे दोन ट्रेंड सुरू झाले होते. दीपिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आता दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला. दीपिकाचा हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. एका मासिकाच्या लेखात लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव बदलण्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर ‘नदीम खान’ आणि ‘राजेश’ ही दोन नावं ट्रेंड होऊ लागली. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ‘नदीम खान’साठी ६० हजार ट्विट केले होते, तर ‘राजेश’साठी ५० हजार ट्विट केले गेले.
दीपिका पदुकोण जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीका सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी ‘छपाक’मधील पात्रांची नावं शोधली. त्यावेळी त्यांना आरोपीचं नाव नईम खान असल्याची माहिती मिळाली. मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपटात नदीम आणि नईम खान या नावांचा उल्लेखही नाही. चित्रपटात ‘राजेश’ असं मालतीच्या प्रियकराचं नाव आहे. त्यावर राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी या वादात उडी घेतली. ढोंगीपणाचं हे आणखी एक उदाहरण आहे, असं ते म्हणाले. सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि त्याचा कोणत्याही व्यक्तींशी साधर्म्य नाही असं तुम्ही म्हणता. हा सगळा ढोंगीपणा आहे, असं ते म्हणाले होते. जेव्हा तुम्ही नाव बदललं आणि धर्मही बदलला तर तुम्ही ते जाणूनबुजून केलं असा आरोप त्यांनी केला. दक्षिण दिल्लीचे भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times