ब्राझिलिया: पोलीस चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराची कबर दोन वर्षांनंतर खोदलेली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर त्याचा मृतदेह कबरीतून गायब होता. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. कबर खोदण्याचे काम १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. तिने सांगितलं की तिला स्वप्न पडलं की ती व्यक्ती कबरीत जिवंत आहे आणि तिच्याकडे मदत मागतो आहे. हे प्रकरण ब्राझीलमधील गोयास राज्यातील असल्याची माहिती आहे.डेली स्टारच्या वृत्तानुसार, २७ वर्षीय लाझारो बार्बोसा डी सूझा हा शहरातील वाँटेड गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल आहेत. ९ जून २०२१ रोजी सीलँडिया येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करून तो फरार झाला होता. या घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
पण, त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी बार्बोसाचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याची कबर खोदलेली आढळून आली. एका १५ वर्षांच्या मुलीने कबर खोदून त्याचा मृतदेह बाहेर काढल्याचं सांगण्यात आलं आहे. कबरीतून मृतदेह गायब झाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

आता पोलिसांनी तपासाअंती जो खुलासा केला आहे त्याने सारेच हादरले आहेत. पोलिसांनी सांगितले की, एका १५ वर्षांच्या मुलीने तिच्या मित्रासोबत मिळून ही कबर खोदली होती. चौकशीदरम्यान, मुलीने सांगितले की बार्बोसा तिच्या स्वप्नात आला होता आणि मदतीची याचना करत होता. तो जिवंत असून त्याला बाहेर काढावे, असे तो विनवत होता सांगितले. यानंतर तिने आपल्या २१ वर्षीय मित्रासोबत मिळून ही कबर खोदली आणि बार्बोसाचा मृतदेह बाहेर काढला.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी राफेल नेरिस यांनी मीडियाला सांगितले की, मुलगी अल्पवयीन आहे, तिचे नाव उघड केले जाऊ शकत नाही. सीसीटीव्हीत दिसल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. नुकतीच त्यांना अटक करण्यात आली आहे. स्वप्न पडल्याने कबर खोदल्याची कबुली तिने दिली आहे. मुलीला तिच्या २१ वर्षीय मित्राने स्मशानभूमीत नेले होते. दोघांच्या कपड्यांवर स्मशानभूमीची माती होती. सध्या तपास करून मृतदेहाला पुन्हा दफन करण्यात आलं आहे.

लग्नाला ५ दिवस असताना बेपत्ता झाली, मग पाण्याच्या पाइपमध्ये अर्धवट मृतदेह; पोलिसांसमोर विचित्र ‘Death Mystery’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here