अहमदनगर: भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नीलेश राणे यांनी स्वत:च्या करोना चाचणी अहवालाबाबत काल संध्याकाळी एक ट्वीट केलं होतं. ‘करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी,’ असं आवाहन नीलेश राणे यांनी केलं होतं.

वाचा:

नीलेश राणे यांचं हे ट्वीट रोहित पवार यांनी रीट्वीट केलं आहे. ‘नीलेशजी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,’ असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी नीलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्विटरयुद्ध गाजलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखरेच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर नीलेश यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. साखर उद्योगाला आजवर झालेल्या मदतीचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली होती. रोहित पवार यांनी त्यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं होतं. त्यानंतर नीलेश यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. कालांतरानं हा वाद थांबला होता. त्यामुळंच रोहित पवारांच्या ताज्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to กรองหน้ากากอนามัย Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here