आग्रा : आपल्या बालपणीच्या मित्राच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं. यमुनेच्या काठावर मित्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच या जिवलगाने जळत्या चितेत उडी घेतली. यामध्ये तो ९० टक्के भाजला होता. त्यानंतर आग्रा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात शनिवारी ही हृदयाला चटका लावणारी घटना घडली.फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावात राहणारे अशोक कुमार लोधी (४४) कर्करोगाने त्रस्त होते. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेजारील गाडिया पंचवटी गावातील रहिवासी असलेला त्यांचा मित्र आनंद गौरव राजपूतही तिथेच उपस्थित होता.

“जेव्हा अंत्यविधींनंतर ग्रामस्थ स्मशानभूमीतून बाहेर पडत होते, तेव्हा ‘दोस्त मै आता हूँ’ असं म्हणत आनंद राजपूतने अचानक त्यांच्या जळत्या चितेवर उडी घेतली. त्याला बाहेर काढेपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला एसएन मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली.

मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ
आनंद राजपूतचा मोठा भाऊ कमल सिंग यांनी सांगितले की, दोघे लहानपणापासूनच एकत्रच होते. “दोघेही एकाच शाळेत गेले आणि दोघेही एकाच दिवशी लग्नबंधनातही अडकले. अशोक लोधी एक निष्णात ढोलकी वादक होते, तर माझा भाऊ त्याच्यासोबत झांज (मंजीरा) वाजवत असे. त्यांना अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये संगीत वाजवायला बोलावले जायचे. ते लोकप्रिय होते” असेही कमल सिंग यांनी सांगितले.

नावाप्रमाणेच ठरला आदर्श; खारुताईला जीवनदान देणाऱ्या चिमुरड्याची सच्ची दोस्ती

या दोघांची मैत्री गावात चांगलीच प्रसिद्ध होती. ग्रामप्रधान गेंदालाल राजपूत यांनी सांगितले की, “ते दोघे शेतात तासनतास गाणी गाण्यात घालवायचे आणि अनेकदा एकत्रच जेवायचे. दोघेही स्वभावाने धार्मिक आणि विनम्र होते.”

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर
“दोन वर्षांपूर्वी लोधींना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. पाच मुलींचे वडील असलेल्या आनंद राजपूत यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चात हातभार लावला. कारण लोधींनी आपल्या मित्राच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च उचलला होता”

झोक्यातून बाळ पडू नये, आईने काळजीपोटी बांधला रुमाल; फास बसून चिमुकल्याचा करुण अंत

बालपणीच्या मित्रापासून विरह झाल्याचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी चितेत उडी मारली. हे आत्महत्येचे प्रकरण आहे. या प्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, असे प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here