सोलापूर: सोलापूर शहरातील एका महिलेला हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली आहे. माझ्या भाऊजीसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत ही मारहाण केल्याची फिर्याद संबंधित महिलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये एमआयएमचा माजी नगरसेवक गाजी जहागीरदार याचे नाव आल्याने सोलापुरात एकच चर्चा सुरू आहे.सदर बाजार पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गाजी जहागीरदार, समीर जहागीरदार, कमो शेख, मुन्ना शेख आणि इतर २ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदारने माझ्या भाऊजीसोबत अनैतिक संबंध का ठेवते असा जाब विचारत पीडित महिलेला भर चौकात खाली पाडून हॉकी स्टिकने मारहाण केली आहे.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story
पीडित महिलेने प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली

पीडित महिला आणि एमआयएम नगरसेवक गाजी जहागीरदार यांचे भाऊजी यांच्यात जमिनीच्या देवाणघेवाणवरून २०२१ पासून ओळख आहे. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमसंबंधामुळे एमआयएमच्या माजी नगरसेवकाच्या बहिणीच्या सुखी संसारात फळी निर्माण झाली होती. पती हा स्त्रीलंपट आहे, असा आरोप करत ती गेल्या अनेक वर्षांपासून माहेरी राहत होती. याचाच राग मनात धरून एमआयएमच्या माजी नगरसेवकाने टोकाचे पाऊल उचलले.

पीडित महिलेला हॉकी स्टिकने मारहाण

पीडित महिला ही २७ मे रोजी दुपारी औषध आणण्यासाठी सोलापूर शहरातील रंगभवन चौकात गेली होती. एमआयएम नगरसेवक गाजी जहागीरदार याने शिक्षक मित्र कमो शेख आणि इतर मित्रांना सोबत घेत पीडित महिलेला रंगभवन चौकात गाठलं. खाली पाडून जबर मारहाण केली. पायावर हॉकी स्टिकने मारहाण केली. भरचौकात दिवसाढवळ्या एका महिलेला मारहाण होत असल्याने रंगभवन चौकात एकच गोंधळ उडाला.

सिग्नल तोडणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून भर चौकात मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

नागरिकांनी आरडाओरडा केल्याने गाजी जहागीरदार, समीर जहागीरदार, शिक्षक मित्र कमो शेख यांनी तेथून पळ काढला. जखमी महिलेला ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर बाजार पोलिसांनी सिव्हिल पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची फिर्याद नोंद करून घेतली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक जमादार करत आहेत.

Sakshi Murder Case: साहिलचे साक्षीवर ४० वार, आई उन्मळून पडली, काळीज चिरणारा आक्रोश, दिल्लीच्या कानठळ्या बसल्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here