अहमदाबाद : आयपीएलच्या फायनलच्या राखीव दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर आता पंचांनी मैदानाची पाहणी केली आहे आणि त्यांनी हा सामना आता किती षटकांचा होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे.या सामन्यात पहिला डाव सलीसलामत पार पाडला. गुजरातच्या साई सुदर्शनने यावेळी ९६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याला वृद्धिमान साहाने अर्धशतकी साथ दिली. दमदार फलंदाजी करत गुजराच्या संघाने यावेळी २१४ धावांचा डोंगर उभारला. चेन्नईचा संघ २१५ धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरला खरा. पण चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने यावेळी चौकार मारला आणि त्यानंतर पावसाचे मैदानात आगमन झाले. त्यानंतर जवळपास अर्धा तास तरी पाऊस पडला. त्यानंतर पंचांनी रात्री १०.४५ वाजता मैदानाची पाहणी केली. त्यानंतर पंचांनी पुन्हा एकदा ११.३० वाजता पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी हा सामना किती षटकांचा खेळवला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार आता मध्यरात्री १२.१० वाजता सामना सुरु होईल आणि तो १५ षटकांचा असेल. चेन्नईला यावेळी १५ षटकांत १७० धावांचे आव्हान देण्यात आले आहे.धोनीने या सामन्याचा टॉस जिंकला होता आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने यावेळी टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय त्याने घेतला. मुंबईने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे धोनी याववेळी प्रथम फलंदाजी घेईल, असे त्याला वाटले होते. पण धोनीने गोलंदाजी घेतल्यामुळे हार्दिकही चकीत झाला. पण या सामन्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे. कारण रविवारी पाऊस पडला होता. त्यामुळे खेळपट्टी जरी ओली नसली तरी जमिनीचा ओलावा मात्र नक्कीच असणार. त्याचबरोबर आज गुजरातमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या सामन्यात जो प्रथम गोलंदाजी करणार त्यांना मदत मिळणार आहे. ही गोष्ट धोनीला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. पण धोनीचा हा निर्णय फसल्याचे पाहायला मिळाले. कारण पावसानंतरही गुजरातच्या फलंदाजांना जास्त फायदा झाला आणि त्यांनी दोनशेपेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here