खेड : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्या वरून नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती तिचा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर पावसाने तुफान राडा घातला आहे. त्यामुळे आयोजकांना आजचा कार्येक्रम उद्यावर ढकलावा लागला. त्यामुळे आजचा कार्यक्रम ठरलेल्या वेळेत याच ठिकाणी होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील मोई येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमाच्या काही तास आधी पावसाने या भागात जोरदार हजेरी लावली. आणि कार्यक्रम ठिकाणी सर्व राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

धरणाच्या काठावर होते कपडे, त्यात मोबाइल वाजत होता, त्यांनी उचलला, माहिती देताच बसला धक्का
गौतमी पाटील ही सद्या तिच्या पाटील आडनाव लावण्यावरून चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक मराठा संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. मात्र माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीच्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे असं म्हणत गौतमी. पाटील हिला संभाजीराजे छत्रपती यांनी समर्थनच दिले आहे.

Shubman Gill : ३ शतके, ४ अर्धशतके आणि ३३ षटकार, तरीही शुभमन गिल विराटला मागे टाकू शकला नाही
याबाबत माहिती देताना आयोजक समीर गवारे म्हणाले की, आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने आजचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून उद्या ठरलेल्या वेळेत कार्यक्रम होणार आहे. पावसाने अचानक राडा केल्याने कार्यक्रम स्थगित करावा लागला असल्याचे गवारे यांनी सांगितले.

४ मृतदेह पाहून लवंगीत रात्रीपासून पेटली नाही चूल, प्रत्येकजण रडला, गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
गौतमी पाटीलची तरुणांमध्ये मोठी क्रेझ

गौतमी पाटीलची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ वाढत आहे. तिच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण हजेरी लावतात. अनेक व्हिडिओ देखील गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे व्हायरल होत असतात. त्यामुळे तिला अनेक ठिकाणी मागणी असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here