म.टा.प्रतिनिधी, पुणे : दिघी येथील संशोधन आणि विकास संस्थेचे (आर अँड डीई) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी डॉ. कुरुलकर यांना कोठडी सुनावली.

डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या (पीआयओ) महिला हस्तकांना काही संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे पाठविल्याच्या संशयातून त्यांच्याविरोधात ‘डीआरडीओ’च्या दक्षता आणि सुरक्षा विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांनी तक्रार केली होती. त्यावरून ‘एटीएस’ने कुरुलकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

सर जडेजा! मोहितच्या गोलंदाजीसाठी जडेजाचा आधीच प्लॅन तयार होता; सामन्यानंतर पाहा काय म्हणाला
डॉ. कुरुलकर यांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याची मुदत सोमवारी (२९ मे) संपली. त्यामुळे सोमवारी पुन्हा या प्रकरणी सुनावणी झाली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, ‘एटीएस’ने तपासाबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला.

कुरुलकर यांच्याकडून संदेशांची देवाणघेवाण झालेले संशयित मेल ‘आयडी’ पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, कुरुलकर यांच्या व्हॉट्सॲपच्या डेटामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचे फोटो पाठविल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, डॉ. कुरुलकर यांनी २०२२मध्ये सहा देशांना शासकीय पासपोर्ट वापरून भेट दिली. २०१० ते २०२२ दरम्यान डॉ. कुरुलकर ५३ दिवस परदेशात होते. तेथे ते कोणाला भेटले, याची माहिती घेतली जात असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

चेन्नईचा नाद करायचा नाय… पाचव्यांदा IPL Final जिंकत केली मुंबई इंडियन्सशी बरोबरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here