नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर सर्वसामान्य नागरिकांचे सातत्याने लक्ष असते. गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून ३० मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर वेबसाईटवर अपडेट करण्यात आले आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी दररोज त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले असून सर्वसामान्यांना आजही पेट्रोल आणि डिझेल जुन्याच दरांवर खरेदी करावे लागणार आहे.

व्हायरल होतोय अमूल लस्सीमध्ये बुरशी असल्याचा दावा करणारा व्हिडिओ; जाणून घ्या काय आहे सत्य
सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर वाहन इंधनाचे दर आजही स्थिर आहेत. अशाप्रकारे दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या महानगरांमध्ये किमती कायम आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झालेला नसून दिल्लीशिवाय मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर नोएडा आणि गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत.

वडिलांची एक चूक ठरली भाऊबंदकीचं कारण; एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या भावांमध्ये दुरावा
दुसरीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. WTI कच्चे तेल ०.१९% वाढून $७३.८२ प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेल ०.०३% घसरवून प्रति बॅरल $७७ वर ट्रेंड करत आहे.

डिझेलसाठी बीड बस डेपोकडे पैसेच नाही; ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु; प्रवाशांची तारांबळ अन् संताप

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर इकडे तपासा
तुम्ही अगदी सहज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासू शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. यात शिपिंगची किंमत, कर आणि डीलर कमिशन समाविष्ट असतो. दरम्यान, जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत जाणून घ्यायची असतील, तर इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्ही RSP डीलर कोड ९२२४९ ९२२४९ वर SMS करून किंमत जाणून घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here