चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीच्या मेदांचा मेडिकेअर रुग्णालयात निधन झाले. महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार आणि कोणत्याही आव्हानाशी दोन हात तयार करायला तयार असणारा जिगरबाज नेता अशी बाळू धानोरकर यांची ओळख होती. अनेक चढउतारांनी भरलेला बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक असा राहिलेला आहे. स्वत:च्या कुवतीवर प्रचंड आत्मविश्वास असणारा नेता म्हणूनही बाळू धानोरकर यांची ओळख होती. त्यामुळेच की काय, बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही लढायची तयारी दाखवली होती. ‘पक्षाने आदेश द्यावा, मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’, हे त्यांचे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. भाजप ही आमची पैदाईश आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प हद्दपार झाले. त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहणार नाही. पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्ष बाकी आहेत. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकद माझ्यात आहे. आगामी तीन वर्षांच्या कालखंडात धानोरकर तुम्ही वाराणसीत जा, असा आदेश पक्षाने द्यावा. जर मी गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर नाव बाळू धानोरकर सांगणार नाही, असे सांगत बाळू धानोरकर यांनी एकेकाळी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वाविरोधात दंड थोपटले होते.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले!

कोण आहेत बाळू धानोरकर?

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार होते. त्यांचा जन्म ४ मे १९७५ रोजी यवतमाळमध्ये झाला. त्यांनी कला आणि कृषी शाखेचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी चालवली. त्यानंतर भद्रावतीमध्ये बारही सुरु केला होता.

Balu Dhanorkar: शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले!
बाळू धानोरकर आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २००४ नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. पण बाळू धानोरकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here