अहमदाबाद: एका थरारक फायनलसह आयपीएल २०२३चा शेवट झाला. पावसामुळे ही मॅच जवळ जवळ ३ दिवस चालली, ज्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला आणि विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले. ही मॅच २८ मे रोजी रविवारी सुरु होणार होती पण पावसामुळे टॉस देखील झाला नाही. अखेर राखीव दिवशी म्हणजे २९ मे रोजी ही मॅच झाली. सोमवारी लढत निश्चित वेळेत सुरु झाली, मात्र पहिल्या डावातनंतर पावसाला सुरुवात झाली. मॅच पुन्हा थांबली त्यानंतर रात्री १२ नंतर म्हणजे ३० मे रोजी मॅच सुरु झाली.चेन्नईला आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळून दिल्यानंतर धोनी निवृत्त होईल असे वाटले होते. मॅच झाल्यानंतर पाहा धोनी काय म्हणाला….

पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. ज्यावर धोनी म्हणाला, जर परिस्थिती पाहिली तर ही योग्य वेळ आहे की मी निवृत्ती घ्यावी. माझ्यासाठी हे बोलणे खुप सोप आहे की, तुमच्या सर्वांचे आभार. पण पुढील ९ महिने कठोर मेहनत घेऊन पुन्हा परत येणे आणि एक हंगाम पुन्हा खेळणे फार कठीण आहे.

सर जडेजा! मोहितच्या गोलंदाजीसाठी जडेजाचा आधीच प्लॅन तयार होता; सामन्यानंतर पाहा काय म्हणाला
धोनी पुढे म्हणाला, यासाठी माझ्या शरीराने साध दिली पाहिजे. चेन्नईच्या चाहत्यांनी जे प्रेम मला दिले आहे. आता वेळ आली आहे की मी त्यांना काही तरी दिले पाहिजे. हे माझ्याकडून त्यांना गिफ्ट असेल की मी अजून एक हंगाम त्यांच्यासाठी खेळू. त्यांनी जे प्रेम आणि उत्साह दाखवला आहे, आता मला देखील त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे. लोकांना मी आवडतो आणि ते माझ्यावर प्रेम करतात कारण मी जसा आहे तसा त्यांना आवडतो आणि मला स्वत:ला बदलायचे नाही.

हा माझ्या करिअरचा अखेरचा टप्पा आहे. हंगामातील पहिली लढत याच मैदानावरून झाली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये माझे नाव पुकारले जात होते. चेन्नईमध्ये देखील असेच झाले. पण मी पुन्हा परत येऊन जितके खेळायचे तितके खेळणार, असे धोनी म्हणाला.

अंतिम सामन्यात धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने प्रथम फलंदाजीकरत २० षटकात ३ बाद २१४ धावा केल्या आणि चेन्नईला २१५ धावांचे मोठे आव्हान दिले. मात्र चेन्नईच्या डावाला सुरुवात झाली आणि ४ चेंडूनंतर पाऊस सुरू झाला. पावसामुळे ओव्हर कपात करण्याचा निर्णय झाला आणि चेन्नईला १५ षटकात १७१ धावांचे टार्गेट देण्यात आले. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना चेन्नईला पहिल्या ४ चेंडूवर फक्त ३ धावा करता आल्या होत्या. रविंद्र जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि अखेरच्या चेंडूवर चौकार मारून संघाला पाचवे विजेतेपद मिळून दिले.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here