भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता धोनीला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. धोनीला यापूर्वी खेलरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पण आता धोनाला भारतरत्न पुरस्कारही देण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. त्यामुळे धोनीला आता भारतरत्न का देण्यात येऊ नये, असा सवालही आता विचारला जात आहे.

धोनीला भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी काही खासदारांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे केली आहे. मध्य प्रदेशमधील खासदार आणि पूर्व मंत्री पी. सी शर्मा यांनी धोनीला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली होती. धोनीने भारताला बरेच काही मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा, तो या पुरस्काराचा हकदार आहे, असेही शर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर शर्मा यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” संपूर्ण जगामध्ये भारतीय क्रिकेटला विजेता ठरवणारा महेंद्रसिंग धोनी हा देशाचे एक रत्नच आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. धोनीने क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. हा सन्मान देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. त्यामुळे धोनी या पुरस्काराच्या लायक नक्कीच आहे.”

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आज सर्वांना धक्का देत अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली. धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे धोनीला भारतरत्न देण्याची मागणी आता जोर धरू लागली असल्याचे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here