मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि आयपीएल टीम गुजरात टायटन्स (GT) चा क्रिकेटपटू शुभमन गिल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले होते. कधी विमानतळावर, कधी एकत्र जेवण करताना त्यांचे फोटो समोर आले होते. यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, शुभमनचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोबतही जोडले गेले होते.आई बंगाली तर बाबा जर्मन, तरीही सावत्र बाबांचं आडनाव लावते अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का?
शुभमन नक्की कोणत्या साराला डेट करतो याचा गोंधळ सुरू असतानाच अलीकडेच सारा अली खान आणि शुभमनने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्या आल्या. म्हणजे हे नातं संपलं. आता एकीकडे रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत, तर दुसरीकडे साराही ‘जरा हटके जरा बच के’ को-स्टार विकी कौशलसोबत नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना पाहायला गेली होती. यावेळी ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.


आयपीएलच्या अंतिम सामन्यात शुभमन गिलचा संघ गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोनीचा संघ चैन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात पावसामुळे बरीच अडचण आली असली तरी चाहत्यांच्या जल्लोषात कोणतीही कमतरता नव्हती. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये धोनीच्या शैलीत संघाला विजय मिळवून दिला.

आता सारा अली खानबद्दल बोलायचं झालं तर, अंतिम सामन्यात शुभमन गिल लवकर आऊट झाल्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. त्याला धोनीने ‘विजेच्या गतीने’ यष्टिचित केले आणि पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. शुभमनने यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध झंझावाती खेळी खेळून १२९ धावा केल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत तो ३९ धावाच करू शकल्याने चाहत्यांनी त्याचा राग सारावर काढला.

रस्त्यावर आलेलं कृष्णा अभिषेक- गोविंदाचं भांडणं, मामा- भाच्याच्या भांडणाला कश्मिरा होती कारण

गुजरात टायटन्सच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, सारा अली खान सामना पाहण्यासाठी आली होती, त्यामुळे शुभमन लवकर आऊट झाला. इतकेच नाही तर सीएसकेच्या विजयानंतर आणि जीटीच्या पराभवानंतर साराने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते पाहून चाहत्यांनी ‘सारा दीदी बेवफा है…’ असेही म्हटले.

‘चला हवा येऊ दे’च्या मंचावर लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाईंसोबत भाऊची भन्नाट लावणी; सगळेच घायाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here