मुंबई : अदानी ट्रान्समिशनने २०२३ च्या जानेवारी-मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले असून या तिमाहीत कंपनीने तिच्या नफ्यात वर्षभरात जोरदार वाढ नोंदवली आहे. कंपनीने माहिती दिली की, जानेवारी ते मार्च या कालावधीत अदानी ट्रान्समिशनचा निव्वळ नफा ७०% वाढून ३८९ कोटी रुपये झाला असून वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा २२९ कोटी रुपये होता. ऑपरेशन्समधून एकात्मिक उत्पन्न १७% वाढून ३,०३१ कोटी रुपये झाले आहे.नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
कंपनीच्या संचालक मंडळाने अनिल सरदाना यांची कंपनीचे एमडी म्हणून १० मे पासून पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय कंपनीचे नाव अदानी ट्रान्समिशनवरून बदलून अदानी एनर्जी सोल्युशन्स असे करण्यासही बोर्डाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

LIC Share: मजबूत निकालाने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, शेअरची किंमत तेजीत वाढतेय, वाचा डिटेल्स
निकालावर गौतम अदानी यांचे भाष्य
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, अदानी ट्रान्समिशन नेत्रदीपक वाढ देण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. आम्ही आमच्या देशाच्या वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक दर्जाची उपयुक्तता म्हणून आमचे स्थान मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत. त्या दिशेने काम करत आहोत.

संसदेत अदानी प्रकरण गाजलं; विरोधी खासदारांचं संसदेच्या व्हरांड्यात बॅनर झळकवत आंदोलन

EBITDA वाढला
या तिमाहीत अदानी ट्रान्समिशनचा EBITDA ९ टक्क्यांनी वाढून ८७२ कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी वितरण EBITDA ४३% वाढून ८३४ कोटी रुपये झाले.

अदानींच्या शेअर्सचा धमाका! या गुंतवणूकदाराने १०० दिवसात कमावले ७६८३ कोटी रुपये, पाहा कोण आहे
अदानी ट्रान्समिशन शेअर किंमत
मंगळवारी अदानी ट्रान्समिशनचा शेअर घसरला. कंपनीचा शेअर्स ४.७८ टक्क्यांपर्यंत घसरून ७९२.४० रुपयांपर्यंत आला. गेल्या पाच सत्रांमध्ये हा शेअर्स १२ टक्क्यांनी घसरला असून मागील एका महिन्यात या शेअर्समध्ये २०.३७ टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय निकालापूर्वी अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. सोमवारी कंपनीचे निकाल जारी झाले आणि विक्रीमुळे शेअर्स बीएसईवर ३.०४% घसरून ८२४.९० रुपयांवर आले. तर दिवसाच्या अखेरीस थोडी रिकव्हरी झाली, परंतु तरीही स्टॉक रेड झोनमध्ये क्लोज झाले. सोमवार, २९ मे रोजी बीएसईवर २.१७% घसरून स्टॉक ८३२.३५ रुपयांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here