अहमदाबाद: आयपीएलचं १६ पर्व अखेर संपलं आहे. धोनीच्या चेन्नईनं विजेतेपदावर नाव कोरलं तर गुजरात टायटन्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यंदाच्या आयपीएलमध्ये भारतातील युवा खेळाडूंचा दबदबा दिसून आला. गुजरातच्या संघानं क्वालिफायर २ मध्ये आणि अंतिम फेरीच्या लढतीत २०० धावांचा टप्पा पार केला. यामध्ये साई सुदर्शन या खेळाडूचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबई विरुद्ध साई सुदर्शननं ४३ धावा केल्या, तर चेन्नई विरुद्धच्या अंतिम लढतीत त्यानं ४७ बॉलमध्ये ९६ धावा केल्या. सुदर्शनच्या वादळी खेळीनंतर त्याचा आयपीएलपर्यंतचा प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात गुजरातला नवा हिरो मिळाला आहे. साई सुदर्शननं अखेरच्या दोन्ही मॅचमध्ये दमदार कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. अंतिम फेरीच्या लढतीत साई सुदर्शनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत तुफानी खेळी केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर साई सुदर्शननं चौकार षटकारांची आतिषबाजी केली.

सुदर्शननं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या बॉलपासून फटकेबाजी सुरु केली. त्यानं २०४ च्या सरासरीनं ८ चौकार आणि ६ षटकार लगावले. सुदर्शनच्या खेळीनं गुजरातनं २१४ धावांपर्यंत मजल मारली.
MS Dhoni: धोनीचा आयपीएलची ट्रॉफी स्वीकारताना मनाचा मोठेपणा, एका कृतीनं मनं जिंकली, चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव

कोण आहे साई सुदर्शन?

साई सुदर्शन हा चेन्नईचा रहिवासी आहे. २०२० पासून त्यानं चेन्नईच्या टीमकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. साई सुदर्शनननं चेन्नईकडून ७ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. ११ लिस्ट ए सामने, २५ टी-ट्वेन्टी सामने देखील तो खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं ४६.७७ च्या सरासरीनं ५७२ धावा केल्या आहेत. तर, लिस्ट ए प्रकारात ६६४ धावा केल्या आहेत. तर, टी-२०मध्ये त्याच्या नावावर ७६३ धावांचं रेकॉर्ड आहे. सुदर्शन गोलंदाजी देखील करु शकतो.

गुजरातनं २०२२ मध्ये २० लाख रुपयांना संघात घेतलं होतं. त्या हंगामात अखेरच्या पाच सामन्यात १४५ धावा केल्यानं त्याला गुजरातनं पुन्हा संधी दिली. यंदाच्या त्यानं ८ सामन्यांमध्ये ५१.७१ च्या सरासरीनं १४१.४१ स्ट्राईक रेटनं ३६२ धावा केल्या आहेत.

Balu Dhanorkar: ती गोष्ट बाळू धानोरकरांच्या कानावर पडताच…; अजित पवारांनी सांगितला दिलदारपणाचा किस्सा

टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन आश्विननं साई सुदर्शननं एल्वरपेट क्रिकेट क्लब मधून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं जॉली रोवर्स क्लबमध्ये त्यानं क्रिकेट खेळणं सुरु ठेवलं. २०२० मध्ये त्यानं तामिळनाडूच्या संघात प्रवेश केला, असं आश्विननं सांगितलं. आश्विननं गुजरात टायटन्सचं देखील कौतुक केलं आहे. गुजरात टायटन्सनं सुदर्शनला संधी दिल्याबद्दल आश्विननं सदिच्छा दिल्या आहेत.

फायनल मॅच हारला पण एका वाक्यात मन जिंकून गेला हार्दिक; मला जर पराभूत व्हायचे असेल तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here