आयुष्यमान चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ११ वर्षीय चिमुकल्याला दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र ही बाब त्याच्या कुटुंबापासून लपवण्यात आली. मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये राहणारे फयाझ खान त्यांच्या ११ महिन्यांच्या मुलाला घेऊन जबलपूरमधील रुग्णालयात गेले होते. मुलाला ताप होता. रुग्णालयानं उपचारांसाठी अवाजवी शुल्क आकारलं.
चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यानंतरही रुग्णालयानं उपचार सुरुच ठेवले. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं रुग्णालयात सुधारणा होत नसल्याचं सांगण्यत आलं. त्यामुळे कुटुंबियांनी चिमुकल्याला अन्य रुग्णालयात हलवण्याचं ठरवलं. तसं त्यांनी रुग्णालय प्रशासनाला सांगितलं. यानंतर रुग्णालय प्रशासनानं चिमुकल्याला अचानक मृत घोषित केलं.
चिमुरड्याच्या मृत्यूबद्दल समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालयानं उपचार आणि औषधांच्या नावाखाली मोठी रक्कम आकारल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला. जबलपूरमधील ओमटी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रुग्णालयानं आपल्याला मुलाच्या मृत्यूबद्दल अंधारात ठेवल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. मूल जिवंत असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं नाटक रुग्णालयानं केलं आणि उपचार, औषधांच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.