मुंबई : लातूरच्या एका शेतकऱ्याची १३ लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने एका जोडप्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. आपल्या मुलाला मध्य रेल्वेत नोकरी लावून देण्याचं खोटं आश्वान दाखवून १३ लाख रुपये लुबाडल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

गेल्या २० मे रोजी तक्रारदार शेतकरी हा नातेवाईकासोबत मुंबईत आला होता. कुणाच्यातरी सांगण्यावरून सांताक्रूझ (पूर्व) मध्ये दोन आरोपींपैकी त्यांनी एका आरोपीची भेट घेतली होती. रेल्वेत शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी लावून देण्यासाठी आरोपीने १७ लाख रुपये मागितले होते. त्यानंतर शेतकऱ्याने हे पैसे टप्प्याटप्याने देतो, असं म्हटलं होतं. काही दिवसांनी आरोपीने शेतकऱ्याला फोन केला आणि पैशांची मागणी केली. मुलासाठी रेल्वेत नोकरी हवी असेल, तर लवकर पैसे द्या असं त्याने म्हटलं. यानंतर शेतकऱ्याने १.०५ लाख रुपये आरोपीला दिले. यानंतर आरोपीने शेतकऱ्याला मुलासह मुंबईला बोलावलं. शेतकरी मुलाला घेऊन मुंबईतील सीएसएमटी येथील रेल्वेच्या इमारतीत आला. तिथे आधीच २४ उमेदवार मुलाखतीसाठी बसलेले. यावेळी आरोपीने शेतकऱ्याकडून आणखी ५.७ लाख रुपये घेतले, असा आरोप तक्रारदार शेतकऱ्याने केला आहे.

एक्स्प्रेस रोखते लोकलची वाट; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…
गेल्या वर्षी १५ सप्टेंबरला आरोपीने शेतकऱ्याला मुलाच्या नियुक्तीचं (अपॉइंटमेंट लेटर) पत्र घेण्यासाठी बोलवलं. आणि यावेळी आरोपीने शेतकऱ्याकडून आणखी ६ लाख रुपये घेतले. तसंच एकाला नाही तर दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्यासाठी लवकरच नियुक्ती पत्र देऊ, असं त्याने शेतकऱ्याला सांगितलं. पण यानंतर शेतकऱ्याने आरोपीला फोन केला तेव्हा त्याने उडवाउडीची उत्तरं दिली. यानंतर शेतकऱ्याने अनेकदा फोन करून आरोपी आणि त्याच्या पत्नीचे मोबाइल बंद असल्याचं समोर आलं. या प्रकरणी फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून मुंबईत वाकोला पोलिसांनी शनिवारी गुन्हा एफआयआर दाखल केला आहे.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रशासनाकडून मिळणार ५ लाख रुपयांचा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here