मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २८ मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी केले. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, या नाण्याचे वजन सुमारे ३४.६५ ते ३५.३५ ग्रॅम आहे.

संसद परिसराची प्रतिमा
भारतीय संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे विशेष नाणे लॉन्च करण्यात आले आहे. नाण्याच्या एका बाजूला संसद परिसराची प्रतिमा असेल आणि प्रतिमेच्या खाली ‘२०२३’ हे वर्ष लिहिलेले असेल. नाण्याच्या मागील बाजूस देवनागरी लिपीतील ‘भारत’ आणि इंग्रजीतील ‘इंडिया’ या शब्दांच्या मधोमध अशोक स्तंभाच्या सिंहाची प्रतिमा असेल. रुपयाचे चिन्ह ‘₹’ आणि आंतरराष्ट्रीय अंकांमधील मूल्य ‘७५’ देखील सिंहाच्या प्रतिमेच्या खाली कोरलेले असेल.

जुनं ते सोनं; पण.. नवं ते हवंच !
चार धातूंचे नाणे
नव्या नाण्याचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास ४४ मिमी असेल. हे नाणे चार धातूंचे असेल. त्यात ५०% चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि पाच टक्के जस्त असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. सरकार विविध विशेष प्रसंगी नवीन नाणी जारी करते.

हे नाणे चलनात येईल का?
स्मारक नाणे नावाचे हे नाणे सामान्य चलनात असणार नाही. हे व्यवहारासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. १९६४ पासून सुरू झालेल्या वर्षांमध्ये अशी १५० हून अधिक स्मारक नाणी बाजारात आली आहेत.

Narendra Modi : नव्या संसद भवनाचं लोकार्पण, सेंगोलची लोकसभेत स्थापना, नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत
नाणे कसे खरेदी करावे
हे नाणे कोणीही खरेदी करू शकतो. हे अधिकृत वेबसाइट www.indiagovtmint.in वरून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे खरेदी केले जाऊ शकते. स्मारक नाणी रोखीने किंवा चेकने घेता येत नाहीत. तसेच तुम्हाला १० पेक्षा जास्त नाणी खरेदी करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागेल.

New Parliament Building: शास्त्रज्ञ होता-होता आर्किटेक्ट झाले, ८६२ कोटींत नवीन संसद भवन उभारणारे बिमल पटेल कोण?
नाण्याची किंमत किती?
या नाण्याची किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी सांगितले की, नाण्याची किंमत किमान १,३०० रुपये आहे. खरी किंमत जाणून घेण्यासाठी सरकारकडून येणा-या माहितीची वाट पाहावी लागेल, तरच या नाण्याची किंमत किती असेल हे कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here