अहमदाबाद: आयपीएल २०२३ मध्ये साधारण धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा, म्हणजे रविंद्र जडेजाच्यानंतर, पण गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या फायनल मॅचमध्ये जेव्हा विजय जवळ दिसू लागला तेव्हा जडेजाला मागे ठेवत धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. चाहत्यांना वाटले धोनी त्याच्या स्टाइलने विजेतपद मिळून देईल. मात्र तसे झाले नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.कर्णधार धोनी आयपीएलची अखेरची मॅच खेळतोय असे अनेकांना वाटत होते. त्याने शून्यावर बाद होणे हे चाहत्यांसाठी धक्कादायक होते. स्वत: धोनी देखील निराश झाला. ऐरवी धोनीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखता येत नाहीत. पण यावेळी तसे झाले नाही. बाद झाल्यानंतर ते मैदानातूनबाहेर जाऊन डगआउटमध्ये बसलेल्या धोनीच्या चेहऱ्यावरील निराशा सर्वांना दिसत होती. सामना जस जसा शेवटाकडे आला धोनी नेहमी प्रमाणे शांत दिसत होता. समोर चाललेल्या मॅचमध्ये चाललेल्या गोष्टींकडे फक्त तो पाहत होता.

धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे? विजेतेपदानंतर सांगितले भावनिक कारण…
जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार मारला तेव्हा चेन्नईच्या अन्य खेळाडूंनी यावर टाळ्या वाजवल्या तेव्हा देखील धोनी शांत राहिला आणि जेव्हा अखेरच्या चेंडूवर चौकार लगावण्यात आला तेव्हाही धोनी अगदी निर्विकार दिसला. संघातील खेळाडू आणि स्टाफ धोनीकडे जल्लोष करत येत होते तेव्हा धोनीने फार प्रतिक्रिया दिली नाही. त्याची नजर मैदानातून विजयाचा चौकार मारून येणाऱ्या रविंद्र जडेजाकडे होती.

विजयी चौकार मारल्यानंतर जडेजाला फक्त ही एक गोष्ट करायची होती; सर्वांना चकवा देत पाहा काय केलं

धोनीच्या आजूबाजूला चेन्नईच्या खेळाडूंची गर्दी होती. तशीच गर्दी जडेजाच्या मागे देखील होती. पण जडेजा थेट धोनीकडे आला आणि त्यांनी मिठी मारली. धोनीने जडेजाला उचलून घेतले. त्या क्षणापर्यंत धोनीने स्वत:च्या भावना चेहऱ्यावर आणल्या नव्हत्या. पण जडेजाच्या त्या एका मिठीने धोनीच्या डोळ्यात पाणी आले. अर्थात धोनीने पुन्हा स्वत:च्या भावना रोखल्या. या संंपूर्ण घटनेचा व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे.

फायनल मॅच हरला पण एका वाक्यात मन जिंकून गेला हार्दिक; मला जर पराभूत व्हायचे असेल तर…

चेन्नईच्या पाचव्या विजेतेपदानंतर धोनी इतका शांत होता की जणू त्याच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नव्हती. मात्र काही वेळाने तो नॉर्मल झालेला दिसला आणि मैदानातील सर्वांसोबत हसत खेळत भेटून बोलू लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here