छत्रपती संभाजीनगर: आजारी असल्यामुळे तुमच्या घरी आलो आहे असं सांगत बहिणीच्या घरी आलेल्या भावाने सकाळी बहीण आणि दाजी भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जाताच संधी साधून चार लाख ७५ हजार रुपये ठेवलेली घरातील पैशांची बॅग घेऊन पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये बायकोच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवऱ्याशी भांडण, रागात मैत्रिणीच्या घरी गेली, वृद्धाशी लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगतसिंह हरी सिंह (वय ४२ रा. सिडको महानगर) हे धुळे सोलापूर महामार्गावर साजापूर फाटा येथे असलेल्या मुकुल गोयल विकास पाईप आणि स्टील कंपनीमध्ये वसुली करण्याचे काम करतात. शनिवार दिनांक २७ रोजी कंपनीचे मालक रजत बंसल यांनी दिवसभर कंपनीमध्ये वसूल झालेल्या पैशांची बॅग भगतसिंग यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. ही बॅग घेऊन भगत सिंह हे घरी आले यावेळी त्यांना घरामध्ये त्यांचा मेहुना आलेला दिसला. भगतसिंह यांनी विचारपूस केली असता, मी आजारी असल्यामुळे तुमच्या घरी आराम करण्यासाठी आलो आहे असं कारण दशरथसिंह क्रांतिसिंह (वय 25 रा.राजस्थान, हल्ली मु.दहेगाव बंगला) याने सांगितलं.

शासन आपल्या दारी कार्यक्रमात अन्नाची प्रचंड नासाडी

थोडावेळ घरात थांबून दशरथ सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडला. यानंतर रात्री उशिरा दहा वाजेच्या सुमारास घरी परतला. यावेळी भगतसिंह झोपले होते. सकाळी आठ वाजता भगतसिंग हे पत्नीला घेऊन पंढरपूर येथे भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. यावेळी घरामध्ये भगतसिंग यांची मुलं आणि दशरथ झोपलेला होता. काही वेळाने भाजीपाला घेऊन घरी आल्यानंतर भगतसिंग यांना दशरथ दिसला नाही. तसेच घरात ठेवलेली पैशांची बॅग देखील कपाटात नसल्याचे लक्षात आलं. घरातील पैशाची बॅग घेऊन दशरथ घेऊन गेल्याचा संशय आल्याने भगतसिंग यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

‘तो’ प्रवास ठरला अखेरचा! दुचाकीने जात असताना काळानं दाम्पत्याला घेरलं; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here