नांदेड : समाजात तृतीयपंथीयांना दुजाभावाची वागणूक मिळते. ते जवळ आले की नागरिक त्यांच्याकडे डोळे वटारत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. मात्र अशाही परिस्थितीत आयुष्याशी संघर्ष करत नांदेड शहरातील एका तृतीयपंथीयाने बारावीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण प्राप्त करत यश मिळवलं आहे. या तृतीयपंथीयाच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमोल सर्जे उर्फ सेजल असं या तृतीयपंथीयाचं नाव असून एक ट्रान्स वुमेन आहे.अमोल उर्फ सेजल ही काही वर्षांपासून तरोडा भागात आपल्या गुरू सोबत वास्तव्यास आहे. इतर तृतीयपंथीयांप्रमाणे तो टाळ्या वाजवून आपला उदरनिर्वाह करते. अशा परिस्थितीतही सेजलने आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पहिली ते १०वी पर्यंत त्याचं देगलुरला शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर अकरावी आणि बारावीपर्यंतचं शिक्षण आश्रमशाळा शिवजी तांडा जळकोट येथे पूर्ण केलं.

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत अमोल याने ६२ टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे कुठलंही खासगी शिकवणी न लावता त्याने हे यश गाठलं आहे. बारावी परीक्षेत यश संपादन करणारी सेजल ही मराठवाड्यातील पहिली तृतीयपंथीय असल्याचा दावा केला जात आहे.

आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, कामगाराचा मुलगा कामगार आयुक्त बनला!
वयाच्या सतराव्या वर्षी ट्रान्सजेंडर

सेजल आधी अमोल होता. अमोल मुलगा होता पण त्याचे हावभाव मात्र तृतीयपंथीयासारखे होते. त्यामुळे त्याने वयाच्या सतराव्या वर्षी लिंग परिवर्तन केलं. या शस्त्रक्रियेनंतर त्याने आपलं नाव बदलून सेजल असं ठेवलं. परीक्षा काळात सेजलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र लोक काय म्हणतील, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा राहील या गोष्टीची पर्वा न करत तिने बारावीची परीक्षा दिली आणि त्यात तिने यश देखील मिळवलं. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

देवदर्शनास निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला, भरधाव कार ४-५ वेळा पलटली अन्…
पोलीस दलात काम करण्याची इच्छा

एकीकडे समाजात वेगळी वागणूक मिळत असताना शासनाच्या वतीने त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तृतीयपंथीयांच्या उत्कर्षासाठी सुविधा केंद्र चालविण्यासाठी दिले आहे. त्यातच आता नुकताच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सेजलने पोलीस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here