बीड: सध्या समाजातील कानाकोपऱ्यात जितका राजकीय विषय चर्चिला जातोय, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, आपल्या अदांनी भुरळ घालणाऱ्या गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा सुरु आहे. या चर्चेत भर पडण्याचं कारण म्हणजे बीडच्या तरुणाने तिला लिहिलेलं पत्र. २६ वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहित थेट लग्नाची मागणी घातली आहे. “गौतमी, तुझ्या इच्छा-अटी सर्व मान्य, बोल तू होती का माझी परी?” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता तरुणाने दिला. इतकंच नाही, तर लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने म्हटलं आहे.

बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांनी गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, की ‘गौतमी पाटील, तू भारी, तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना तू म्हणाली होतीस की, “आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा, अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.”

भरधाव कारने इंजिनिअरला उडवलं, चालक जागीच गाडी सोडून पळला, आई-बाबांचा एकुलता एक आधार गेला
तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कुणी लग्नाला तयार नसले, तरी मी माणूसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय २६ वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता मु. पो. चिंचोली माळी, तालुका केज, जिल्हा बीड, या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे” असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान वराच्या शोधत असणारी गौतमी पाटील बीडच्या रोहन गलांडे पाटीलच्या पत्राची दखल घेणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

लिफ्ट मागणं जीवावर बेतलं, २३ वर्षीय तरुणाचा नग्न मृतदेह सापडला, मेघदूत बारमुळे छडा लागला

44 COMMENTS

  1. amoxicillin online without prescription: [url=https://amoxicillins.com/#]canadian pharmacy amoxicillin[/url] amoxicillin 500 mg cost

  2. can you buy generic mobic without dr prescription [url=https://mobic.store/#]cost of cheap mobic without dr prescription[/url] how to get cheap mobic pills

  3. amoxicillin 500mg capsules antibiotic: [url=http://amoxicillins.com/#]antibiotic amoxicillin[/url] where can i buy amoxicillin without prec

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here