नागपूर : नागपुरात एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यात लग्न समारंभावरून परतणाऱ्या कारचा मागचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. यानंतर भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटली. यात वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, कार चालक थोडक्यात बचावला आहे. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमूर-उमरेड रस्त्यावर उमरी फाटा परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यभामा बाळकृष्ण जिलपे (७५) असे मृत आईचे नाव असून गंभीर जखमींमध्ये त्यांचा मुलगा भोजराज बाळकृष्ण जिलपे (५२) आणि सून सुनीता भोजराज जिलपे (४८) यांचा समावेश आहे. हे तिघेही कुही येथील रहिवासी आहेत. पिंपळनेरी, जिल्हा चंद्रपूर येथील राजूरकर कुटुंबातील एका विवाह सोहळ्यासाठी चिमूर येथे गेले होते. लग्नानंतर तिघेही चिमूरहून उमरेडेमार्गे एमएच-४०/सीएच-३४४६ क्रमांकाच्या कारने कुहीकडे येत होते.

Crime Diary: साहिल, प्रविण अन् अजय; प्रेमाचं जाळं खूनापर्यंत गेलं; साक्षी मर्डर केसची स्टार्ट टू एण्ड कहाणी
पिंपळनेरीजवळ उमरी फाटा परिसरात आले असता त्यांच्या कारचा मागचा डावा टायर फुटला आणि भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. रस्त्यावर दोन वेळा कार उलटल्याने कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. काही वेळातच सत्यभामा यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सत्यभामा यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेला. तर भोजराज व सुनिता यांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, यात सुदैवाने कार चालकाला गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी चिमूर पोलिसांनी नोंद केली असून पोलीस निरीक्षक मनोज गभणे तपास करत आहेत.

Sakshi Murder Case: साक्षीचा एक्स बॉयफ्रेंड साहिलला भिडला, दिल्ली हत्याकांडाला नवं वळण; पोलीस हैराण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here