चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला आहे. पत्नी प्रतिभा धानोरकर यांना शोक अनावर झाल्याचे पाहायला मिळाले, तर त्यांच्या मातोश्रींच्या अश्रूंचा बांध फुटला. धानोरकर यांचे सासरे सुरेश काकडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. धक्कादायक म्हणजे दोनच दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते, तर आज त्यांचीही प्राणज्योत मालवली.

“खासदार बाळू धानोरकर राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्याचा मला अभिमान होता. लोक मला विचारायचे, तुमचा जावई खासदार आहे. मी अभिमानाने सांगत होतो, कुठल्याही कार्यक्रमात ते जेव्हा स्टेजवर असायचे, तेव्हा मला ते आवाज द्यायचे, विचारपूस करायचे. असा त्यांच्या स्वभाव होता. जावई खासदार आणि मुलगी आमदार ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे” असं सुरेश काकडे म्हणाले.

“जावईबापूंची प्रकृती चिंताजनक होती. हे मला नंतर कळलं. मी जेव्हा त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारसाठी गेलो, तेव्हा प्रतिभा माझ्याजवळ आली अन् तिने सांगितलं की त्यांची प्रकृती बरोबर नाही. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो.” आपल्या जावयाबद्दल जुन्या आठवणीत रमलेले सासरे ओल्या डोळ्यांनी खासदारांच्या आठवणी सांगत होते.

बाळू धानोरकरांचं पार्थिव नागपुरात, पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला; शिवानी वडेट्टीवारांनी प्रतिभाताईंना सावरलं

प्रतिभा धानोरकर यांना शोक अनावर

नागपूर विमानतळावर खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव पोचले तेव्हा कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांना शोक अनावर झाला. अश्रू थांबेनासे झाले. त्यांची स्थिती पाहता सुनील केदार यांनी पुढे होत त्यांना आधार दिला.

Pune Loksabha: पुण्यातील पोटनिवडणुकीत धंगेकर की मोहन जोशी? काँग्रेसच्या उमेदवाराबाबत नेत्याचं सूचक वक्तव्य
विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांनी त्यांना सांभाळून घेतले. यावेळी संपूर्ण धानोरकर कुटुंब सोबत होते. दीड वाजता धानोरकर यांचे पार्थिव वरोराकडे रवाना झाले. दुपारी चार वाजेपासून धानोरकर यांचे पार्थिव निवासस्थानी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here