मुंबई : तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागातील पाण्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. महाष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे. निळवंडे धरणाच्या उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पहिली जात आहे कारण हा प्रकल्प पूर्ण होण्यास ५३ वर्षे लागली.

या धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काळ भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. नाशिकच्या सिन्नौर आणि अहमदनगर भागातील पाणीप्रश्न सोडवणारे धरण बांधण्यासाठी एवढा वेळ लागला, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

संरक्षण दलाच्या विमानखरेदीत लाचखोरी भोवली, रोल्स रॉइस कंपनी, अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा; काय आहे नेमकं प्रकरण?
१९७० मध्ये प्रकल्पाला मंजुरी
अहमदनगरच्या म्हालादेवी गावात हा प्रकल्प १९७० मध्ये मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी ७.९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. तर धरणाची धारण क्षमता ११ टीएमसी निश्चित करण्यात आली होती. प्रकल्पाशी संबंधित सर्व काही निश्चित झाले होते, परंतु ९ वर्षे फाईल बंदच राहिली. १९९५ मध्ये हा प्रकल्प म्हाळादेवी गावातून नीलवंडे येथे स्थलांतरित करण्यात आला. धरणाची धारण क्षमता ११ टीएमसीवरून ८.५२ टीएमसीपर्यंत कमी केली, पण बजेट वाढले.

अहमदनगरच्या शिक्षकाने ठेवला नवा आदर्श, असं काम केलं की तुम्ही कुठे बघितलं नसेल
विलंब होत राहिला, बजेट वाढतच गेले
निळवंडे धरण प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. प्रकल्पाला विलंब होत राहिला, ज्यामुळे प्रकल्पाचे बजेट सातत्याने वाढत गेले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणी कोपरगावसह नाशिक जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे बांधकाम २०१४ साली पूर्ण झाले, मात्र कालव्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यासह प्रकल्पाचा खर्च ५१७७ कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच जे काम ७.९ कोटी रुपयांत होणार होते, त्यात विलंबामुळे ५१६९ कोटी रुपयांची भर पडली, ज्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च ५१७७ कोटी रुपयांवर पोहोचला. हा संपूर्ण प्रकल्प धरण आणि कालव्याच्या जाळ्यासह १८२ किमी भागात पसरलेला आहे.

फडणवीसांचे दौरे वाढताच राष्ट्रवादीने बालेकिल्ल्यात ताकद लावली, वर्धापन दिनानिमित्त मेळावा
१२५ गावांचा प्रश्न सुटणार
दरम्यान, धरण बांधणीसाठी ५३ वर्षाचा कालावधी लागला असला तरी आता या धरणामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटेल. ६८००० हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न संपणार आहे. हा बंधारा सुरू झाल्याने नाशिक ते अहमदनगर दरम्यानच्या १२५ गावांना पिण्याचे पाणी मिळेल. नीलवंडे धरणातून लहान वितरणांसाठी पाईपचे जाळे तयार केले जात आहे मात्र, ते वापरात येण्यासाठी आणखी तीन वर्षाचा कालावधी लागेल.

नाशिक : धरणाच्या दरवाजांवर तरूणाची स्टंटबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here