ही कहाणी वाचताना तुम्हाला एखादी सस्पेन्स वेब सिरीज बघितल्यासारखं वाटेल. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा इंटरनेट नुकतेच सुरू झाले होते. पण, ते वापरणारे फार कमी लोक भारतात होते. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी एक रंजक किस्सा सांगितला आहे. ते शीख लाइट इन्फंट्रीमध्ये दाखल झाले. १० वर्षांनंतर इंटेलिजन्स कॉर्प्समध्ये त्यांची पहिली पोस्टिंग बेंगळुरूमध्ये झाली. त्यांनी कम्प्युटर सिस्टीम विकत घेतलं. त्यांना कम्प्युटरमध्ये मास्टरी मिळवायची होती.
२००२-०३ मध्ये एक प्रकरण समोर आलं. कोणीतरी मिलिटरी इंटेलिजन्स स्कूलला एक पत्र पाठवलं. त्यामध्ये लिहिलं होतं की त्यांना निवृत्त जेसीओ इत्यादींची भरती करायची आहे. राजन यांना हा टास्क मिळाला होता की त्यांनी या फर्मला कन्फर्म करावे मगच पुढे शिफारस जाईल. त्यांना बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचे होते. हे ठिकाण करवाड, राजस्थानचे असल्याचं त्यांनी सांगितलं. ते एक गाव होतं. राजन यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या पत्त्याची चौकशी केली असता त्यांना कळले की इथे अशी अनेक पत्रे येतात पण इथे तशी कुठलीही फर्म नाही, त्यामुळे पोस्ट ऑफीस ती पत्र परत पाठवतात. त्यामुळे या फर्मचे गूढ अधिकच वाढत चालले होते. ते गाव खूप छोटं होतं. पोस्ट ऑफीसमध्ये माहिती घेतल्यानंतर राजन जेवणासाठी बसस्थानकावर गेले. तिथे बसस्थानकाजवळ त्यांना एक छोटासा सायबर कॅफे दिसला. त्यांनी एक ईमेल आयडी तयार केला. त्या पत्रावर एक ईमेल एड्रेसही सापडला, ज्यावर त्यांनी मेल केला.
ईमेलमध्ये राजन यांनी लिहिले की, माझे वडील इंटेलिजन्स कॉर्प्समधून निवृत्त जेसीओ आहेत. मला वाटते की तुम्ही निवृत्त लोक शोधत आहात. मी बंगळुरु येथे काम करतो. पुढे संपर्क कसा साधायचा ते सांगू शकाल का? मेल केल्यानंतर त्यांनी जेवण केले. ते बसची वाट पहात होते. त्यांच्याजवळ थोडा वेळ होता म्हणून त्यांनी पुन्हा सायबर कॅफेमध्ये जाऊन ईमेल लॉग इन केला. तेव्हा त्यांच्या ईमेलला उत्तर आलेले होते.
राजन यांना माहित होतं की मेलवर कोणीतरी सतत लक्ष ठेवत असेल. आता या गूढाच्या तळापर्यंत कसे पोहोचायचे याचा विचार ते करु लागले. त्या दिवसांत सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलबाबत खूप चर्चा सुरु होती. राजन यांना माहित होते की हॅकर्स याचा शोध लावू शकतात. त्यानंतर रात्री बस पकडून ते बंगळुरूला आले. त्यावेळी त्यांच्याकडे नोकियाचा फोन होता. आयटी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक मित्रांना त्यांनी मेसेज केले. मेल कसा ट्रेस करायचा हे माहित आहे का? कोणालाही हॅकर्स माहित आहेत?, असं त्यांनी त्यांच्या अनेक मित्रांना विचारलं.
त्यांच्या एका मित्राने त्यांना मेसेज केला की, टाइम्स ऑफ इंडियाचे पहिले पान पाहा. राजन यांनी तात्काळ पेपर विकत घेतला. पहिल्या पानावर ‘इंडियन स्नेक्स’ या हॅकिंग ग्रुपबद्दल एक लेख होता. काही भारतीय हॅकर्स पाकिस्तानला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याची ती बातमी होती. या हॅकर्सनी एक व्हायरस तयार केला होता. पाकिस्तानचा डेटा अमेरिकेत होता. या व्हायरसने अमेरिकेतील काही सर्व्हरला इन्फेक्ट केलं होतं. एफबीआयने गुन्हाही दाखल केला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराची मदत
राजनने TOI च्या बंगळुरू कार्यालयात जाऊन ही स्टोरी लिहिणाऱ्या पत्रकाराबद्दल विचारले. त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. पत्रकाराला भेटून राजन यांनी त्यांच्याकडे मदत मागितली. मला त्या हॅकर्सना भेटायचं आहेस असं त्यांनी सांगितलं. TOI च्या पत्रकाराला त्याच्या स्त्रोताचे रक्षण करायचे होते. तरी, पत्रकाराने यावर तात्काळ सकारात्मक उत्तर देत म्हटलं की, साहेब, मी त्यांना सांगू शकतो आणि ते कधी संपर्क साधतील, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमचा नंबर द्या, मी फॉरवर्ड करेन. यावर राजन म्हणाले ठीक आहे.
३-४ दिवसांनी राजन यांना फोन आला की तुम्हाला हॅकर्सशी बोलायचे आहे. फोनवरील व्यक्ती म्हणाली की ती हॅकर नाही, पण ती मदत करू शकते. त्याने राजन यांना ब्रिगेड रोड (बेंगळुरू) येथे बोलावलं. तेव्हा राजन यांनी त्या व्यक्तीला सांगितलं की कोणीतरी मला मेल करत आहे आणि मला त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे. तुम्हाला मेलचा एक्सेस मिळाला तर तुम्हाला ते शोधता येईल. त्या व्यक्तीने राजनचा ईमेल आयडी मागितला. काही दिवसांनी तो पुन्हा त्याच ठिकाणी भेटला.
हॅकरने राजनला हा मेल कर्नाटकातील एका शहरातून पाठवल्याचे सांगितले. हा ईमेल आयडी आणि त्याचा पासवर्ड आहे. तुम्ही स्वतः मेल बघा. ही फर्म कर्ज वसुलीचे काम करत होती. त्यांनी रिपोर्ट तयार केला आणि सांगितले की पत्ता चुकीचा आहे पण तो माणूस तिथे आहे आणि तो दुसऱ्या गावात आहे. एकूणच प्रकरण संशयास्पद होते. हे प्रकरण सोडवल्यानंतर राजनला ‘इंडियन स्नेक्स’विषयी जास्त समजून घ्यायचे होते आणि त्याला काही पुस्तके पाहण्यास सांगण्यात आले. मग 6kb स्पीडमध्ये ऑनलाइन माहिती मिळणे खूप अवघड होते. पुस्तके विकत घेतली आणि खूप काही समजले.
४० मेल आयडी आणि फक्त एक पासवर्ड
७-८ महिने झाले. काउंटर इंटेलिजन्समध्ये राजनचे काम पाकिस्तानी हेर पकडण्याचे होते. ‘इंडियन स्नेक्स’च्या अनुभवातून त्यांना बरेच काही समजले होते. त्यांची पत्नी बारमेरमध्ये शिक्षिका होती. त्यावेळी बारमेरमध्ये तीन सायबर कॅफे होते. एकूण १२ संगणक. बंगळुरूमध्ये शेकडो सायबर कॅफे होते. हा भाग पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. एके दिवशी त्यांना कळले की कोणीतरी बाडमेरच्या सायबर कॅफेमधून लॉग इन करून पाकिस्तानी मोबाइलवर एसएमएस पाठवत आहे. याहू चॅटद्वारे हे सर्व काही घडत होते. तो आयएसआय एजंट होता. त्याच्याकडे ४० मेल आयडी आणि फक्त एक पासवर्ड होता.
तो सिंध प्रांताचा होता. पाक एजन्सीने त्याला प्रशिक्षणानंतर पाठवले होते. राजनला त्याचा मेल वाचता आला. जरी प्रत्येक क्षणी त्याला ट्रेस करणे कठीण होते, परंतु जेव्हा तो हेडरसह मेल करत होता, तेव्हा सर्व्हिस प्रोव्हायडरकडून माहिती मिळत असे. पण ते त्याला पकडू शकले नाही. 2 वर्षे ते त्याचा शोध घेत होतं. गुप्तहेर इतका हुशार होता की तो प्रत्येक वेळी सायबर कॅफे बदलत असे. त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत उशिर होत होता. मात्र पुढील एका वर्षात त्या ला आयबीने अटक केली. ही बातमी देखील टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाली होती.