Nagpur Chicks Hatched From The Eggs Due To Rising Temperature : विदर्भात तापणान वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाढत्या तापमानामुळे अंड्यातून पिल्ल बाहेर येत असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे.
नागपुरातील पारा यंदा तीनवेळा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. नागपुरात यंदा तापमानाने विक्रम मोडला नसला तरी उष्णतेच्या दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे चित्र एकट्या नागपूरचे नाही. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यावर शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु अलिकडच्या काळात जगभरात तापमानात वाढ झाली आहे. आणि आता तापमानात झालेली ही वाढ सामान्य नाही, यावर सर्वांचे एकमत आहे.
उष्णतेची ही स्थिती केवळ भारत, पाकिस्तान किंवा सौदी अरेबियामध्ये नाही. जगभरातील अनेक देशांना यंदा तीव्र उष्णतेच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तरेकडील देशांमध्येही यंदा तापमानात वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार आर्क्टिक समुद्रातील ९५ टक्के जुना आणि प्रचंड जाडीचा हिम नाहीसा झाला आहे. उष्णतेच्या लाटेमागील मुख्य कारण म्हणजे निसर्गातील मानवी हस्तक्षेप म्हणजे प्रदूषण आणि जंगलतोड ही आहे. हा बदल निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचा दावा करणारे विविध शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.