अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकदार बनला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून तो अधिक पेटलेला असतानाच शिंदे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा तरूण रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे सांगण्यात येते.

यासंबंधी अमित अरुण चिंतामणी (रा. जामखेड) यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर सुभाष गवसणे (रा. पिंपळगाव उंडा, जामखेड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने फोन करून तसेच फेसबुकवर व्हिडिओद्वारे धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. गवसणे हा रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.

दुर्गम गावातल्या मुलांपर्यंत पुस्तकं पोहचवायला गुरुजींची पायपीट; वाचनाच्या गोडीसाठी पालथे घालतायेत डोंगरदऱ्या
चिंतामणी यांच्या मोबाइलवर एका नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांग नाहीतर पाहून घेईन असे म्हणाला. चिंतामणी यांनी हा प्रकार राम शिंदे यांना सांगितला. तेव्हा चिंतामणी यांना समजले की, सागर गवसणे याने फेसबुक लाइव्ह करत धमकी दिली आहे. चिंतामणी यांनीही तो व्हिडिओ पाहिला आणि पोलिसांत तक्रार दिली. धमकीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जामखेड पोलिसांनी चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून सागर सुभाष गवसणे (रा. पिंपळगाव उंडा, जामखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

… तर शरद पवारांना ऐकायला तिथे कोण येणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना थेट आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here