दरम्यान या प्रकारानंतर बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने बीसीसीआयवर टीका केली आहे. त्याने काही फोटो शेअर करत एक ट्वीट केले. कमाल आर खान अर्थात केआरकेने आयपीएलच्या अंतिम सामन्यातील काही फोटो आणि परदेशातील एक असे एकूण चार फोटो शेअर केलेत. ग्राउंड स्टाफ स्पंज, ड्रायरचा वापर करुन मैदान कौरडं करण्याचा प्रयत्न करतंय. त्याने यातून थेट बीसीसीआयला लक्ष्य केले आहे.
KRK ने या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘डिजिटल भारतातील श्रीमंत संस्थांपैकी बीसीसीआय ही एक आहे. अमृतकालमधून हजारो कोटींचा खर्च करुन BCCI ने अहमदाबादमध्ये सर्वौत्तम असणाऱ्या स्टेडियमपैकी एक असे स्टेडियम उभारले. IPL २०२३ च्या फायनलमध्ये पाऊस पडला आणि मैदान कोरडं करण्यासाठी ग्राउंड स्टाफकडून प्रयत्न करण्यात आले. इतर देशात मैदान कोरडे करण्यासाठी मशिन (चौथा फोटो) वापरले जाते.
केआरकेच्या ट्वीटनंतर क्रिकेट रसिकांनी त्यालाच सुनावले आहे. प्रत्येक गोष्टीला ट्रोल करण्याची संधी हा सोडत नाही, अशी कमेंट एकाने केली आहे. तर अन्य एकाने म्हटले की हिच पद्धत ओली खेळपट्टी सुकविण्यासाठी योग्य आहे.
पहिल्या डावानंतर अंतिम सामन्यात पावसाची बॅटिंग
GT vs CSK या सामन्यातील पहिला डाव सुरळीत पार पडला होता. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने ९६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि या खेळीच्या जोरावर जीटीने २१४ धावांचा डोंगर उभारला. यानंतर चेन्नईकडून ऋतुराज फलंदाजीसाठी आलेला, त्याने चौकारही मारला आणि पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास अर्धा तास पाऊस कोसळत होता. पाऊस थांबल्यानंतर पंचानी रात्री १०.४५ आणि ११.३० वाजता खेळपट्टीची पाहणी केली. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकांचा सामना खेळवला जाईल असे निश्चित करण्यात आले.