नागपूर : अल्पवयीन तरुण आणि तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, हा प्रकार प्रेयसीच्या आईला समजताच त्यांनी मुलीला भेटू नकोस, असे तरूणाला बजावले. याचा प्रियकराला राग आला. त्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या आईवर चाकूने वार केले. ही खळबळजनक घटना शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Accident News: लग्नाहून घरी येताना कारचा टायरच फुटला, आईचा जागीच मृत्यू तर मुलगा अन् सून जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि मुलगी (वय १४) यांचे एकमेकांवर प्रेम होते. घरच्यांपासून लपून ते एकमेकांना भेटत होते. मात्र,मुलीच्या आईला हा प्रकार कळला. आईने आपल्या मुलीला त्या मुलाशी बोलणे आणि भेटणे बंद करण्यास सांगितले. काही दिवसांनी आईने मुलीला नातेवाईकांकडे राहायला पाठवले. दरम्यान, मुलीच्या अल्पवयीन प्रियकराला याची माहिती मिळाली. या प्रकाराने त्याला राग आला. रागाचा भरात शनिवारी रात्री तो मुलीच्या घरी पोहोचला.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

प्रेमात पडलेल्या या प्रियकराने आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलीच्या आई व वडिलांना चाकूने भोसकून जीवे मारण्याची धमकी दिली. ते त्यावेळी एका कार्यक्रमाला जात असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रियकर तरून आणखीनच संतापला. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या आईवर हल्ला केला, तिला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला.

वेब डेव्हलपर अन् वसुली एजंटचा प्लॅन, डॉक्टरांकडे ४० लाखांच्या खंडणीची मागणी, पोलिसांची एन्ट्री होताच…
त्यावेळी, प्रेमी युवकाने आपल्या मित्राला थांबवले आणि प्रेयसीच्या घराची तोडफोड केली. मुलीच्या आई वडीलांना पुन्हा मारण्याची धमकी देऊन ते दोघे तेथून पसार झाले. शेजाऱ्यांना घटनेबद्दल कळताच त्यांनी मुलीच्या आई वडिलांना दवाखान्यात दाखल केले. मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून कपील नगर पोलिसांनी प्रेमी युवक आणि त्याचा मित्र साहील या दोघांविरुद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here