: मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपुरनंतर आता अमरावती येथील अनेक मंदिरांनी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जळगावमध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता. तसेच अमरावती येथे झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी निर्णय झाला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महाकाली शक्तीपीठ येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अमरावती येथील अंबादेवी संस्थान, बालाजी मंदिर (जयस्तंभ चौक), श्री. पिंगळादेवी देवस्थान (नेर पिंगळाई), श्री. संतोषी माता मंदिर, श्री. आशा- मनिषा देवी संस्थान (दर्यापूर), श्री. लक्ष्मी-नारायण देवस्थान (देवळी, अचलपूर), श्री शैतुतबाग हनुमान मंदिर (परतवाडा), श्री. दुर्गामाता मंदिर, वैष्णौधाम या मंदिरांसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील २५ मंदिरांमध्ये येत्या २ महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले.ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा- महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्ये सुद्धा वस्त्रसंहिता असावी असे मत यावेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अमळनेर येथील श्री. देव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरामध्ये अनेक वर्षापासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस आणि सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे.महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्विक वेशभूषा असली पाहिजे, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या कपड्यांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्तीस्वातंत्र्य असू शकत नाही,प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here