नाशिक: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पांगरी दरम्यान नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये चालकाने कमरेला बांधण्याच्या करदोळ्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. आता या बसचालकाच्या आत्महत्येचे कारण समोर आले असून महिला वाहकासह तिची बहीण आणि अन्य दोन अशा एकूण चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला वाहक आणि तिच्या बहिणीच्या जाचाला कंटाळून चालकाने आत्महत्या केल्याचा उलगडा चालकाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून झाला आहे.

शिर्डीकडून नाशिकच्या दिशेने येणारी बस रस्त्यात बंद पडल्याने प्रवासी आणि वाहकाला अन्य बसमध्ये बसवून दिल्यानंतर चालक राजेंद्र ठुबे यांनी बसमध्येच आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. नेमकी आत्महत्या की घातपात असा संशय देखील व्यक्त केला जात होता. मात्र, चालक राजेंद्र ठुबे यांच्या खिशात असलेल्या नोटांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याने या आत्महत्येमागील गूढ उकललं आहे. चालकाचे वडील हिरामण रघुनाथ ठुबे यांनी वावी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वाहक नीलिमा वानखेडे, त्यांची बहीण प्रमिला इंगळे आणि अन्य दोघे ठक्कर बंधू यांच्या विरोधात राजेंद्र ठुबे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ वर्षांची मैत्री, मग भरवस्तीत साक्षीचा खून; AC मॅकेनिक कसा बनला खुनी? साहिलची पूर्ण कहाणी
२०१३ मध्ये राजेंद्र ठुबे हे चालक म्हणून परिवहन महामंडळात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी एका महिला वाहकासोबत ओळख झाल. या ओळखीतून महिला वाहकाने ठुबे यांच्याकडून वेळोवेळी चार लाख ५८ हजार ९६१ रुपये उधार घेतले होते. त्यापैकी ६० हजार रुपये तिने परत केले. ठुबे यांनी उर्वरित पैशांची वारंवार मागणी करूनही महिलेने पैसे परत दिले नाही. या उलट पैसे मागितले म्हणून महिला वाहक नीलिमा वानखेडे, त्यांची बहीण प्रमिला इंगळे आणि अन्य दोघे ठक्कर बंधू यांनी दुबे यांना शिवी

कानाला हेडफोन, एका हातात मोबाईल अन् व्हिडिओ पाहत चालवली बस, चालकाचा व्हिडिओ व्हायरल

२४ मे च्या रात्री सिन्नर शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात शिंदे वस्ती नजीक नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये इमर्जन्सी रुपच्या हँडलला कंबरेच्या करदोड्याच्या साहाय्याने गळफास घेऊन राजेंद्र ठोंबरे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या खिशात सापडलेला मोबाईल आणि पैसे पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. अंत्यविधीनंतर हे पैसे कुटुंबीय मोजत असताना नोटांमध्ये दुमडून ठेवलेली एक चिठ्ठी त्यांना सापडली. ही चिठ्ठी वाचल्यानंतर राजेंद्र ठुबे यांच्या आत्महत्येमागील कारण समोर आले आणि कुटुंबीयांनी ही चिठ्ठी पोलिसांना दिली.

दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here