मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून यांना आव्हान देणारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार यांना भाजपनं मोठी जबाबदारी दिली आहे. पडळकर यांची भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचा:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी पक्षाचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय दहा प्रवक्ते व ३३ चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे. सर्व प्रवक्त्यांना विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार पडळकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी असेल. माजी खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा त्यांच्या बरोबरीनं पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवर भाजपसाठी किल्ला लढवतील.

वाचा:

विधानसभा निवडणुकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. बारामती मतदारसंघातून त्यांनी अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळं ते चर्चेत आले होते. मात्र, तिथं त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर अनेक दिग्गजांना डावलून त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडेच शरद पवार यांच्यावर अपमानकारक टीका केल्यामुळं ते वादात अडकले होते. ‘पवार हे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत’ असं ते म्हणाले होते. भाजपनं त्यावेळी त्यांच्या वक्तव्यापासून हात झटकले होते. मात्र, नवी जबाबदारी देत पक्षानं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

वाचा:

भाजपच्या प्रवक्त्यांची यादी

मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये
भारती पवार – उत्तर महाराष्ट्र
गोपीचंद पडळकर, धनंजय महाडिक – पश्चिम महाराष्ट्र
राम कदम, अॅड. राहुल नार्वेकर – मुंबई
शिवराय कुलकर्णी – विदर्भ
एजाज देखमुख, राम कुलकर्णी – मराठवाडा
भालचंद्र शिरसाट – मुंबई
श्वेता शालिनी – पुणे

पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य

गणेश हाके, अतुल शाह, गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ. अनिल बोंडे, अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, सुरेश धस, प्रदीप पेशकार, निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.

मीडिया सेल सदस्य – देवयानी खानखोजे

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here